मोठी बातमी: नारायण राणेंची विचारपूस करण्यासाठी अमित शाहांचा फोन, म्हणाले…

Amit Shah Narayan Rane | अमित शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केली. तसेच पोलीस कारवाई आणि अटकेचा कारवाईबाबतचे तपशीलही अमित शाह यांनी नारायण राणे यांना विचारल्याचे समजते.

मोठी बातमी: नारायण राणेंची विचारपूस करण्यासाठी अमित शाहांचा फोन, म्हणाले...
नारायण राणे आणि अमित शाह


मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे गोत्यात आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सध्या भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून फोन आणि भेटीगाठी घेऊन आश्वस्त केले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील नारायण राणे (Narayan Rane) यांना नुकताच फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केली. तसेच पोलीस कारवाई आणि अटकेचा कारवाईबाबतचे तपशीलही अमित शाह यांनी नारायण राणे यांना विचारल्याचे समजते. भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता भाजप नारायण राणे यांच्यावरील कारवाईचा वचपा काढण्यासाठी कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

यापूर्वी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचे समर्थन केले होते. आम्ही नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या विधानाशी सहमत नाही. मात्र, एक पक्ष म्हणून भाजप त्यांच्या पाठिशी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील त्याचीच री ओढली होती. याशिवाय, बुधवारी दिवसभरात भाजपच्या नेत्यांकडून नारायण राणे यांना समर्थन देणारी वक्तव्ये करण्यात आली होती. या सगळ्यातूनच भाजपने आपण नारायण राणे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिल्याची चर्चा आहे.

अमित शाहांशी बोला, रामदास आठवलेंचा सल्ला

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी नारायण राणे यांची त्यांच्या जुहू येथील घरी भेट घेतली होती. तसंच आठवले यांनी नारायण राणेंना रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला आहे. राणेंवर झालेली कारवाई ही अन्यायकारक आणि चुकीची असल्याचा आरोपही आठवले यांनी केला होता.

नारायण राणे हे प्रदीर्घ अनुभव घेतलेले नेते असून त्यांच्यावर झालेली पोलिसी कारवाई अन्यायकारक चुकीची आहे. अशा प्रसंगांना पुरून उरणारे निर्भीड नेते नारायण राणे असून त्यांच्या या प्रसंगात रिपब्लिकन पक्ष नारायण राणे यांच्या पाठीशी असल्याचे सांगत ना रामदास आठवले यांनी नारायण राणे यांना पाठिंबा दिला. नारायण राणे अशा प्रसंगांमुळे डगमणारे नेते नाहीत. ते खंबीर आहेत. निडर अहेत. त्यांनी दिल्लीत येऊन झालेल्या प्रकाराची गृहमंत्री अमित शहांना माहिती द्यावी, असे आठवले यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

राणेंनी स्वतःला महान समजणं बंद केलं तरी त्यांच्या आयुष्यातील समस्या औषधांशिवाय बऱ्या होतील, सामनातून राणेंवर पुन्हा हल्लाबोल

नारायण राणे फार दिवस मंत्रिमंडळात राहणार नाही, सामनाच्या अग्रलेखातले 5 स्फोटक मुद्दे

राणेंवरील कारवाईनंतर नाशिक भाजप आक्रमक, मुख्यमंत्री आणि संजय राऊतांविरोधात 3 तक्रार अर्ज

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI