AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप खासदाराचा गौप्यस्फोट, फडणवीसांची शपथ हा पूर्वनियोजित कट, 80 तासात 40 हजार कोटी परत पाठवले

भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे (BJP leader Ananth K Hegde on Devendra Fadnavis oath ) यांनी महाराष्ट्रातील सत्तानाट्याबाबत गौप्यस्फोट केला आहे.

भाजप खासदाराचा गौप्यस्फोट, फडणवीसांची शपथ हा पूर्वनियोजित कट, 80 तासात 40 हजार कोटी परत पाठवले
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Dec 02, 2019 | 10:08 AM
Share

नवी दिल्ली : भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे (BJP leader Ananth K Hegde on Devendra Fadnavis oath ) यांनी महाराष्ट्रातील सत्तानाट्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं ही एक चाल होती. फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा दावा भाजप खासदार अनंत कुमार हेगडे (BJP leader Ananth K Hegde on Devendra Fadnavis oath )यांनी केला.

अनंत कुमार हेगडे म्हणाले, “तुम्हा सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रात आमचा माणूस (फडणवीस) 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला. त्यानंतर फडणवीसांना राजीनामा दिला. त्यांनी हे सर्व नाटक कशासाठी केलं? आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहित नव्हतं का? तरीही ते मुख्यमंत्री का झाले? हा तोच प्रश्न आहे जो सर्वजण विचारत आहेत”.

मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40 हजार कोटी रुपयांची केंद्राचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आले असते, तर त्यांनी या 40 हजार कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता. त्यामुळेच फडणवीसांनी 80 तास मुख्यमंत्रिपदावर येऊन  हे नाटक केलं आणि 15 तासात त्यांनी केंद्राचा हा निधी परत पाठवला”, असा गौप्यस्फोट अनंतकुमार हेगडे यांनी केला.

इतकंच नाही तर भाजपने ही योजना खूप आधीपासून आखली होती. यासाठीच हे ठरवण्यात आलं की त्यासाठी एक नाटक रचावं लागेल. ते सर्व पूर्वनियोजित होतं, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीसांनी 15 तासात 40 हजार कोटी रुपये तिकडे पाठवले, जिथून ते आले होते. अशाप्रकारे फडणवीसांनी केंद्र सरकारचा पैसा वाचवला, असा दावाही अनंतकुमार हेगडे यांनी केला.

तो व्हायरल मेसेज खरा?

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरत आहे. देवेंद्र फडणवीसांनी शपथ का घेतली, याबाबत या मेसेजमध्ये सविस्तर नमूद करण्यात आलं आहे. मात्र हा मेसेज खरा की खोटा याबाबत स्पष्टता होऊ शकत नाही. मात्र अनंत कुमार हेगडे यांच्या गौप्यस्फोटाने तो व्हायरल मेसेज खरा आहे की काय अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.

व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलं आहे?

“महाराष्ट्रात अजित पवारांना हाताशी धरताना भाजपकडून बहुमताची गणितं फसली किंवा चूक झाली, असं तुम्हाला वाटत असेल. पण तो एक सुनियोजित आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. का ? हे वाचा.

बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाला आहे. केंद्र, महाराष्ट्र आणि गुजरात सरकार या निधीवर नियंत्रण ठेवतात. जपानची इच्छा नसली, तरी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना हा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वळवायचा होता. पण त्याच्या अंमलबजावणीसाठी जपान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रोखू शकत नाही. यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द होईल. आणि काँग्रेसला कर्जमाफीच्या नावाखाली निधी काढून घेण्यास मदत होईल.

22 नोव्हेंबरपर्यंत देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री होते. त्यांना ही रक्कम केंद्रीय निधीत हस्तांतरित करता आली नव्हती. म्हणून त्यांनी अजित पवार (अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचा गेम प्लॅन) यांच्याशी करार केला आणि 159 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रं दिली. म्हणून घाईगडबडीत हा शपथविधी उरकण्यात आला.

फडणवीसांनी जवळजवळ सर्व रक्कम केंद्राच्या तिजोरीत वर्ग केली आहे. यामुळे नवीन सरकारला निधीला स्पर्श करणं अशक्य झालं आहे. फडणवीसांनी राजीनामा दिला, पण त्यांना काँग्रेसला बुलेट ट्रेन प्रोजेक्टमध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखता आलं.

सोनिया गांधींनी कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये धरलेला आग्रह हा शेतकरी कर्जमाफीचा असला (कर्नाटक आणि मध्य प्रदेशप्रमाणेच घोटाळा करण्याचा सर्वात सोपा मार्ग) तरी त्यामागे मोदींचं महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचं स्वप्न रोखण्याचा उद्देश होता.

अजित पवारांना याची कल्पना नव्हती आणि त्यांना वाटलं की आपण उपमुख्यमंत्री होऊ शकतो. तीन दिवसांत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर सोपवलेलं निर्धारित काम पूर्ण केलं”, असं व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड