‘मुंबई पलिकडचा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना माहीत नाही’ देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Devendra Fadnavis of Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 'मुंबई पलिकडचा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना माहीत नाही', असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

'मुंबई पलिकडचा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना माहीत नाही' देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
आली मतदानघटिका समिप, मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये वऱ्हाडांची गजबज, मविआचं स्नेहभोजन ट्रायटंडला, भाजप ताजमध्ये तर काँग्रेसचे आमदार रेनिसन्सलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 2:41 PM

लातुर : मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही, असं म्हणत अनेकदा भाजपने ठाकरेंवर टीका केली. तोच धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. ‘मुंबई पलिकडचा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना माहीत नाही’, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ते लातुरमध्ये बोलत होते.

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुंबई म्हणजे महाराष्ट्र असं वाटतं. मुंबई पलिकडचा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना माहीतच नाही. अडीच वर्षांच्या काळात ते केवळ एकदाच ते पाहणी दौऱ्यावर सोलापूरला गेले होते. तेव्हा त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं. त्याच्या पलीकडे ते गेले नाहीत. कुणाच्याही बांधावर जाण्याचे कष्ट त्यांनी घेतले नाही”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला चढवला.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औसा तालुक्यात रस्त्यांचं लोकार्पण करण्यात आलं.आमदार अभिमन्यू पवार यांनी पुढाकार घेत शेतरस्त्याचा प्रश्न मांडला अन् त्या चळवळीला यश आलं. 1 हजार 300 किलोमीटर शेत रस्त्यांचं उद्घाटन आणि लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच 2 हजार 500 एकर फळबागांसह 1 हजार पशु गोठ्यांचे लोकार्पणही केलं गेलं. यामुळे ग्रामिण भागातील रस्ते अधिक सुखकर होणार आहेत. शेतात जाण्याचे रस्ते दुरूस्त झाल्येन शेतीची कामे जलद गतीने होण्यास मदत होईल.

Non Stop LIVE Update
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.