Pankaja Munde : कॉलेजमध्ये असताना कुणी प्रपोज केलंय का?, पंकजा मुंडेंनी खरं-खरं सांगितलं…

झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची मुलाखत झाली. त्यात त्यांना विविध राजकीय, अराजकीय प्रश्न विचारण्यात आले. पंकजा मुंडेंनीही दिलखुलासपणे उत्तरं दिली.

Pankaja Munde : कॉलेजमध्ये असताना कुणी प्रपोज केलंय का?, पंकजा मुंडेंनी खरं-खरं सांगितलं...
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 9:24 AM

मुंबई : ” मी कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा गोपीनाथ मुंडेसाहेब गृहमंत्री होते. मला भरपूर सिक्युरिटी असायची. त्यामुळे शक्यतो माझ्याशी बोलायली लोक घाबरायचे. पण एकदा मैत्री झाली की झाली! मग ती कायम टिकली, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तुम्हाला कुणी प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नाही “मला कुणी प्रपोज नाही केलं. तो सुखद अनुभव मला मिळाला नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे जयहिंद कॉलेजला शिकल्या. तिथे त्यांना कधी कुणी प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची झी मराठीवरील बस बाई बस (Bus Bai Bus) या कार्यक्रमात मुलाखत पार पडली तेव्हा त्यांनी आपल्या कॉलेज जीवनाविषयी आणि लव्ह लाईफविषयी (Pankaja Munde Love Life) दिलखुलास उत्तर दिलं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

विरोधीपक्षातील नेत्यांना फोडलंय का?

होय मी विरोधीपक्षातील नेत्यांना फोडलंय. माझे बाबा गोपीनाथ मुंडेसाहेब यांनी मला सांगितलंय की कायम बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे इतर पक्षात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय. बीड जिल्ह्यात झालेलं पक्षांतर त्याचंच द्योतक आहे. नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीत येणं हे त्याचंच उदाहरण आहे. शिवाय सुरेश धसही भाजपत आले. त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी इतर पक्षातील चांगल्या नेत्यांना पक्षात आमंत्रित करते, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्षफोडीची कबुली दिली आहे. बस बाई बस या कार्यक्रमाचा निवेदक सुबोध भावे याने तुम्ही कधी इतर पक्षातील नेत्यांना फोडलं आहे का?, असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिलंय.

सध्या भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांची आवक चांगलीच वाढली आहे. त्यामुळे इतर पक्षातील नेते भाजपमध्ये जाण्यास कायम उत्सुक का असतात? आणि या नेत्यांना गळाला कोण लावतं? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडलेले असतात. त्याचं उत्तर पंकजा मुंडे यांनी या मुलाखतीत दिलं आहे. झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची मुलाखत झाली. त्यात त्यांना विविध राजकीय, अराजकीय प्रश्न विचारण्यात आले. पंकजा मुंडेंनीही दिलखुलासपणे उत्तरं दिली.

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.