AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP Prasad Lad : महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आणलं, 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप मागच्या मास्टरमाइंडचं नाव भाजपकडून जाहीर

BJP Prasad Lad :"आमच्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कुठलही भांडण होणार नाही. आम्ही त्यांचा सन्मान करु. आम्ही ताकदीने त्यांच्यामागे उभे राहू. जे काय झालं ते चुकीचचं होतं" असं भाजपं नेते प्रसाद लाड म्हणाले.

BJP Prasad Lad :  महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आणलं, 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप मागच्या मास्टरमाइंडचं नाव भाजपकडून जाहीर
Prasad Lad-Eknath Shinde
| Updated on: Oct 24, 2026 | 1:01 PM
Share

महाराष्ट्राचं राजकारण सध्या ऑडिओ क्लिपवरुन तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या ऑडिओ क्लिप बाहेर काढल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपंमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. आपसात आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु होती. त्याला आता भाजपं नेते प्रसाद लाड यांनी वेगळं वळण दिलं आहे. त्यांनी ऑडिओ क्लिपचं खापर संजय राऊत यांच्या डोक्यावर फोडलं आहे. ऑडिओ क्लिपचे रायटर, क्रिएटर संजय राऊत असल्याचा दावा भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला.

“आमच्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कुठलही भांडण होणार नाही. आम्ही त्यांचा सन्मान करु. आम्ही ताकदीने त्यांच्यामागे उभे राहू. जे काय झालं ते चुकीचचं होतं. म्हणूनच आम्ही म्हणतोय त्या ऑडिओ क्लिपची चौकशी केली पाहिजे. ती ऑडिओ क्लिप कोणी, कशी कोणापर्यंत पोहोचवली, ती मनोज जरांगेंपर्यंत कशी गेली, ते शोधून काढलं पाहिजे. आमचा आरोप आहे की हे सामनाने हे केलं. सामनाच्या स्टुडिओमध्ये हे सर्व झालं, त्याची चौकशी झाली पाहिजे. याचा कर्ता, करविता संजय राऊत आहे, त्याला बोलावलचं पाहिजे. संजय राऊत यांचा मनसुबा कधी पूर्ण होऊ देणार नाही. फडणवीसांना बदनाम करण्याचा राऊतांचा मनसुबा आहे. सामनाच्या ऑफिसमध्ये स्क्रिप्ट तयार करण्यात आली” असा आरोप प्रसाद लाड यांनी केला.

आत जावं लागतं, मग पिसींग अँड पिसींग

“बच्चू कडू यांचं म्हणणं मी ऐकलं नाही. बच्चू कडू शिवसेनेत महायुतीत आहेत. मी महायुतीचा घटक आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता आहे, याचं भान ठेऊन ते बोलले तर बरं होईल” असं प्रसाद लाड म्हणाले. “संजय राऊत यांना चांगलं माहित आहे, चौकशी होते तेव्हा काय होतं, आत जावं लागतं. मग पिसींग अँड पिसींग. चौकशा कुठल्याही खोट्या नसतात. निवृत्त न्यायाधीशामार्फत निष्पक्ष चौकशा झाल्या आहेत. माजी आयएएस, आयपीएस अधिकारी नेमून चौकशी झाली आहे. देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्याचा संजय राऊतचा मनसुबा कधी यशस्वी होऊ देणार नाही” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

त्याला कसं कळलं की, क्लिप कोणी बनवली

“आम्ही तेच म्हणतोय, गुन्हा दाखल झाला पाहिजे, संजय राऊतला पहिला उचलला पाहिजे. चौकशी त्याची केली पाहिजे. त्याला कसं कळलं की, क्लिप कोणी बनवली. आमच्या माहितीप्रमाणे सामनाच्या प्रेसमध्ये ही बनली. त्याचे रायटर संजय राऊत होते. त्यांनीच मांडणी केली. संजय राऊतने AI च्या मदतीने व्हॉइस ओव्हर तयार केले” असा आरोप भाजपं नेते प्रसाद लाड यांनी केला.

Follow Us
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
Pankaj Bhoyar : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या आरोपांमागचं सत्य लवकरच समोर येणार?
तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू...; प्रवीण दरेकरांचा सूचक इशारा
Pravin Darekar On Ramdas Kadam : तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू....; प्रवीण दरेकरांचा रामदास कदमांना सूचक इशारा
मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; AQI तब्बल....
Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; दादर चौपाटीवर दृश्यमानता घटली, AQI तब्बल....
जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल
Mangesh Sasane : मनोज जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल, नेमकं प्रकरण काय?