तू यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है, मुनगंटीवारांचं पुन्हा शिवसेना प्रेम!

शिवसेना-भाजपचा एकमेकांविषयीचा स्नेह आजही कायम आहे," असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar on cm Thackeray interview) म्हणाले.

तू यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है, मुनगंटीवारांचं पुन्हा शिवसेना प्रेम!

चंद्रपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत (Sudhir mungantiwar on cm Thackeray interview) घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अनेक राजकीय प्रश्नांवर उत्तर दिली. उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली ही मुलाखत भाजप-सेनेतील स्नेह दर्शविणारी आहे. शिवसेना-भाजपचा एकमेकांविषयीचा स्नेह आजही कायम आहे,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“त्यांचा (उद्धव ठाकरे) पक्षावर राग नाही. तर भाजपबद्दल तक्रार आहे. भाजप आणि शिवसेनेची युती ही 1989 पासून 2014 चा अपवाद सोडला तर 2019 पर्यंत म्हणजे गेले 30 वर्ष ही युती एका विचारासाठी काम करते आहे. एक विचार, एक सूर हे या युतीचे वैशिष्ट्य आहे. काही घटना कदाचित घडल्या असतील, ज्याची पूर्ण माहिती मला नाही.”

“पण जर ही मुलाखत आपण पूर्ण पाहिली, पूर्ण वाचली तर या मुलाखतीचा सारांश एका चित्रपटाच्या गाण्याप्रमाणे सांगता येईल. “तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है” पण यात फक्त एकच बदल केला पाहिजे की, “तू यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है,” असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

“या युतीमध्ये विचाराचे प्रेम आहे. कार्यकर्त्यांचे एकमेकांविषयी स्नेह आहे आणि मित्र भाजपचा आहे. त्यामुळे मला निश्चितपणे या मुलाखतीचा “तू यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है” हाच सारांश वाटतो. या गाण्याप्रमाणे शिवसेना-भाजपचा एकमेकांविषयीचा स्नेह आजही कायम आहे,” असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar on cm Thackeray interview) म्हणाले.

“मुख्यमंत्रीपदाबाबतचा शब्द शेवटी मी दिला नव्हता. शब्द ज्याने कोणी दिला असेल त्याला याबाबतची जास्त माहिती असेल, त्यावर तो व्यक्ती सांगू शकेल. पण जर शब्द दिला असेल तर तो पूर्ण झाला पाहिजे आणि जर शब्द दिला नसेल तर शब्द दिला असे सांगण्यात येऊ नये. भाजपबद्दल कदाचित शब्दाचे पालन केलं नाही म्हणून तुमच्या मनात राग असेल पण तो राग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर व्यक्त करु नका,” असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

“NRC चा जो कायदा आहे त्यात बाळासाहेब ठाकरेंनी अभिप्रेत केलेली भावना आहे. त्यामुळे आपला राग भाजपवर असू शकतो. पण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर हा राग काढता कामा नये. NRC हा लागू झाला पाहिजे. बाळासाहेबांच्या जुन्या भाषणाच्या व्हिडीओ काढून बघितल्या तर आपली भूमिका स्पष्ट होईल,” असेही मुनगंटीवारांनी स्पष्ट (Sudhir mungantiwar on cm Thackeray interview) केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *