BJP Meeting: ना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार ना विश्वासदर्शक ठराव आणणार, भाजपच्या बैठकीतून 10 मोठे मुद्दे

कोअर कमिटीच्या बैठकीत कोर्टाने दिलेला निर्णय, शिवसेनेतील फूट, राज्यातील परिस्थिती या सर्वावर कोअर कमिटीच्या टीमने मंथन केलं, चर्चा केली. भविष्यातील घडामोडींच्या संदर्भात भाजपच्या कोअर टीमने या निर्णयाकडे आपली भूमिका भविष्यात ठरवण्याचा निर्णय केला आहे.

BJP Meeting: ना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार ना विश्वासदर्शक ठराव आणणार, भाजपच्या बैठकीतून 10 मोठे मुद्दे
सुधीर मुनगंटीवार
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 10:40 PM

मुंबई : शिवसेना आणि बंडखोर आमदार प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने आमदारांना दिलासा दिला आहे. तसेच शिंदे गटाच्या सत्तास्थापनाचा मार्गही मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहे. मुंबईत भाजपच्या कोअर टीम (BJP Core Committee)ची बैठक पार पडली. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे सध्या तरी भाजपची वेट अँड वॉच (Wait and Watch)ची भूमिका असल्याचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

भाजपच्या बैठकीतील 10 मोठे मुद्दे

1. कोअर कमिटीच्या बैठकीत कोर्टाने दिलेला निर्णय, शिवसेनेतील फूट, राज्यातील परिस्थिती या सर्वावर कोअर कमिटीच्या टीमने मंथन केलं, चर्चा केली. भविष्यातील घडामोडींच्या संदर्भात भाजपच्या कोअर टीमने या निर्णयाकडे आपली भूमिका भविष्यात ठरवण्याचा निर्णय केला आहे.

2. कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यामध्ये, विशेषतः विधीमंडळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचं आकलन व त्याचा अंदाज केला गेला. राज्यासमोरचे राजकीय प्रश्न लक्षात घेऊन भाजप आपली भूमिका ठरवेल, यावर चर्चेतून शिक्कामोर्तब करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

3. ना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार ना विश्वासदर्शक ठराव आणणार. सध्या भाजप केवळ वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.

4. एकनाथ शिंदेंनी जो दावा केलाय की तेच ओरिजनल शिवसेना आहेत. त्यावर बैठकीत चर्चा झाली. सध्या तरी भाजपाची भूमिका वेट अँड वॉचची आहे. भविष्यकाळात महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.

5. जस जसे शिंदे गटाचे प्रस्ताव येतील तसतसे भाजपची कोअर टीम बैठक घेऊन निर्णय घेईल. सरकार स्थापनेवर कुठलीही चर्चा भाजपच्या बैठकीत नाही. रोज होणाऱ्या घटना बघूनच भाजपा त्यावर निर्णय घेईल.

6. फ्लोर टेस्टची मागणी करण्याची आजच्या चर्चेतून तरी आम्हाला गरज वाटत नाही. यानंतर येणाऱ्या प्रत्येक घटनेनंतर आमच्या भूमिकेवर चर्चा होईल. मंथन होईल, संवाद होईल आणि त्या संवादानंतर निर्णयापर्यंत येऊ, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

7. संविधानात पक्षामध्ये ज्याच्याकडे बहुमत असते, तो पक्षाचा नेत असतो. एकनाथ शिंदेंकडे दोन तृतीयांश आमदार असतील तर त्यांना बंडखोर म्हणता येणार नाही. शिवसेनेचा मूळ हिंदुत्वाच्या विचारासोबत आम्ही आहोत, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. जो भगवा हातात घेतला आहे तो गर्वरहित, वासनारहित, भयरहित ही आमची मूळ कल्पना आहे. वासनारहित आहे याचा अर्थ जो भगवा त्यांनी हातात घेतला आहे, ते खुर्चीची वासना करत नाहीत.

8. बंडखोर आमदार स्वत:ला बंडखोर मानत नाहीत तर ते 24 कॅरेट शुद्ध शिवसैनिक आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे आता संजय राऊतांच्या शब्दात बंडखोर कोण आणि नॉटी कोण हे तर येणारा काळच सांगेल.

9. बंडखोर आमदारांच्या प्रस्तावाशी भाजपचं काही देणे घेणे नाही. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्हाला कुठलाही प्रस्ताव नाही. आम्हाला आज तरी विश्वासदर्शक ठरावाची मागणी करण्याची गरज वाटत नाही. दोन तृतीयांश ज्यांच्याकडे ते ओरिजनल.

10. संजय राऊतांच्या बोलणे मी मनावर घेत नाही, तुम्हीही घेऊ नका. पाप केल्याने कोरोना होत असेल तर उद्धवजींना कोरोना झाला, त्याचा अर्थ झाला. डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा आहे. आम्ही बजेटमध्ये म्हणतो मेडिकल कॉलेज काढले पाहिजे आणि राऊत साहेब बोलतात कंपाऊंडरचे कॉलेज काढले पाहिजे. त्यामुळे त्यांना आम्ही गंभीरतेने घेत नाही.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.