भाजप नेतेही चौकशीच्या फेऱ्यात, ठाकरे सरकार आक्रमक भूमिकेत ?

महाराष्ट्रात (maharashtra) महाविकास आघाडीचं (MVA)सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधक त्यांच्यावर टीका करीत आहे.तसेच हा संघर्ष महाराष्ट्रापुरता मर्यादीत न राहता, केंद्रात आणि राज्यात देखील पाहायला मिळत आहे.

भाजप नेतेही चौकशीच्या फेऱ्यात, ठाकरे सरकार आक्रमक भूमिकेत ?
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 1:56 PM

मुंबई –  महाराष्ट्रात (maharashtra) महाविकास आघाडीचं (MVA)सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधक त्यांच्यावर टीका करीत आहे.तसेच हा संघर्ष महाराष्ट्रापुरता मर्यादीत न राहता, केंद्रात आणि राज्यात देखील पाहायला मिळत आहे. केंद्रात सत्तेत असलेलं भाजप (bjp) महाराष्ट्रातल्या सरकार अडचणीत आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या चौकशी सध्या सुरू असल्याने केंद्रावरती वारंवार टीका करण्यात येत आहे. नेत्यांच्या चौकश्या सुरू असल्याने राजकीय वातावरण अत्यंत तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातचं राज्याने भाजपाच्या अनेक नेत्यांची चौकशी होईल अशी प्रकरण बाहेर काढल्याने संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, नारायण राणे यांची चौकशी होतील अशी प्रकरणं

महाराष्ट्रात भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी 12 मंत्र्यांवरती आरोप केले आहेत. त्यापैकी अनेक आमदारांच्या चौकशी सुध्दा सद्या सुरू आहेत. तसेच प्रत्येक मंत्र्याला जेलमध्ये पाठवणार असं देखील किरीट सोमय्या यांनी वारंवार प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या नेते सुध्दा प्रत्युत्तर देण्याची भाषा करीत आहेत. आता राज्यात भाजपाच्या अनेक नेत्यांवरती गुन्हे दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर चौकशी होईल अशा प्रकारची पावलं राज्य सरकारनं उचलली आहेत. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, नारायण राणे इत्यादी नेत्यांची नावं आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्र सरकारने अडचणी निर्माण केल्याची चर्चा आहे. मागच्या काही दिवसात अशा बातम्या पाहायला मिळाल्या की, राज्यातील भाजपाने नरेंद्र मोदी यांच्याकडे कारवाईबाबत तक्रार केली आहे. आम्ही अशा अटक आणि कारवाईला घाबरत नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांवरती टीका करताना म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्यांच्या चौकशी

अनिल देशमुख, नवाब मलिक या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या अटक झाली आहे. अनिल परब, भावना गवळी, संजय राऊत, प्राजक्त तनपुरे या नेत्यांच्या चौकशी सुरू आहेत. महाराष्ट्रात आता महाविकास आघाडी विरूद्ध भाजप यांच्यात आता चांगलचं राजकीय युद्ध रंगणार आहे. भाजपाच्या नेत्याच्या चौकशी महाराष्ट्र सरकार करत असेल तर आमच्यावर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया भाजपा देत आहे. तसेच केंद्राने महाविकास आघाडीच्या नेत्यावर कारवाई केली तर सुडबुद्धीने कारवाई होत असल्याची टीका महाविकास आघाडीचे नेते करत आहेत.

TV9 Marathi no.1 | महाराष्ट्रात ‘tv9 मराठी’चा दबदबा, बार्क रेटिंगमध्ये अव्वल

आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, Kashmir Files वरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय, लॉन्स फेडरेशनची स्थापना; Corona संकटातून बाहेर काढण्यासाठी चर्चा

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.