विदर्भात मोठा फटका का बसला? भाजपची नागपुरात महत्वाची बैठक

नागपुरात भाजपची (BJP meeting in Nagpur) आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला (BJP meeting in Nagpur) मोठा फटका बसला आहे.

विदर्भात मोठा फटका का बसला? भाजपची नागपुरात महत्वाची बैठक
Follow us
| Updated on: Dec 06, 2019 | 12:02 PM

नागपूर : नागपुरात भाजपची (BJP meeting in Nagpur) आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला (BJP meeting in Nagpur) मोठा फटका बसला आहे. या बैठकीत पराभवाचं आत्मचिंतन करण्यात येत आहे. विदर्भातील भाजपच्या पराभवाची कारणं शोधायला पक्षानं सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील कोअर ग्रुपच्या नेत्यांची बैठक घेत आहेत.

या बैठकीत संघटनमंत्री विजय पुराणीक आणि भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील भाजप कोअर कमिटी नेत्यांची ते बैठक घेत आहेत.  विदर्भात भाजपच्या पराभवाचं आत्मचिंतन करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत सुरुवातीला वर्धा जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.

महाविकासआघाडीचं पुढील लक्ष्य विदर्भ, भाजपच्या गडाला शह देणार? 

विदर्भ हा भाजपचा गड आहे. विदर्भाच्या भरवशावरच 2014 रोजी राज्यात भाजपचं सरकार (Mahavikas aaghadi working in vidarbh) आलं. 2014 रोजी विदर्भात भाजपचे 62 पैकी 44 आमदार निवडून आले. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका बसला. तरीही विदर्भातून भाजपच्या 29 जागा निवडून आल्या.

भाजपच्या याच गडाला शह देण्यासाठी महाविकासआघाडीनं प्लॅन तयार केला आहे. महाविकासआघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाकडून विदर्भात आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विदर्भातील नेत्यांना चांगली मंत्रिपदं देण्यात येणार आहेत. तसेच आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिला जात आहे.

62 जागांपैकी कुणाला किती? 

विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 29 जागा भाजपला मिळाल्या, तर 16 जागा काँग्रेस, सहा जागा राष्ट्रवादी आणि दोन अपक्षांसह सहा जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. आता भाजपच्या या गडाला सुरुंग लावण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु झाले आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

संबंधित बातम्या  

महाविकासआघाडीचं पुढील लक्ष्य विदर्भ, भाजपच्या गडाला शह देणार?  

स्पेशल रिपोर्ट : विदर्भात भाजपला फटका का बसला? ओबीसी नेत्यांना डावलनं भोवलं?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.