AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना बबनराव लोणीकरांची जीभ घसरली, नेमकं काय म्हणाले? वाचा

भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर अडचणीत सापडले आहेत. सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली आहे.

ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना  बबनराव लोणीकरांची जीभ घसरली, नेमकं काय म्हणाले? वाचा
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 25, 2025 | 10:10 PM
Share

भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावर सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली आहे. लोणीकर हे मोदींचे अंधभक्त आहेत अशी टीका काही लोकांनी केली होती, त्यांच्यावर टीका करताना लोणीकरांचा तोल गेल्याचे समोर आले आहे. लोणीकरांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकरांनी भाषणातून टीका केली. जालना जिल्ह्यातील परतुर येथे हर घर सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकरांची जीभ घसरली.

लोणीकर म्हणाले की, ‘कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाची पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे. तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला सहा हजार रुपये पेरणीला दिले आहेत, तुझ्या अंगावरचे कपडे, पायातील बुट-चप्पल सुद्धा सरकारमुळेच आहे’ असं लोणीकरांनी म्हटलं आहे.

याआधीही लोणीकरांनी एका सभेत बोलताना ग्रामस्थांना इशारा दिला होता. विधानसभा निवडणुकीत लीड न मिळाल्याने लोणीकरांनी बोरगावात बोलताना म्हटले की, ‘5 वर्षांमध्ये कमळाचं एक बटन दाबायचं तेही केलं नाही. मी गावाला 8 कोटींचा सिमेंट रोड दिला. मला मत द्या किंवा नका देऊ. मी दोन-तीन वेळेस चव पाहणार, नाहीतर गावावर फुली मारणार.’

कोण आहेत बबनराव लोणीकर?

बबनराव लोणीकर भाजपचे परतूरचे आमदार आहेत. 1999, 2004, 2014, 2019 आणि 2024 मध्ये ते परतूरमधून निवडून आले होते. लोणीकर हे देवेंद्र फडणवीसांच्या 2014 ते 2019 या सरकारमध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री होते.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा