पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या, राहुल गांधींनी दिल्या का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या, राहुल गांधींनी दिल्या का?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अजूनही शरद पवार यांना शुभेच्छा देणारे एकही ट्विट केले नसल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे. (Nitesh Rane Rahul Gandhi)

Yuvraj Jadhav

|

Dec 12, 2020 | 7:23 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील विविध राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार तासांपूर्वी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अजूनही शरद पवार यांना शुभेच्छा देणारे एकही ट्विट केले नसल्याचा दावा केला आहे.  नितेश राणेंनी याबाबत सकाळी साडे अकराच्या सुमारास  ट्विट करुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. (BJP MLA Nitesh Rane raised question about Rahul Gandhi wishes to Sharad Pawar)

भाजप आमदार नितेश राणेंनी नरेंद्र मोदींनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र राहुल गांधींनी शुभेच्छा देणारे एकही ट्विट केले नसल्याचे म्हटले. नितेश राणेंच्या ट्विटनंतर राहुल गांधी यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक पेज आणि ट्विटरवरील अकाऊंट पाहिले असता राहुल गांधींनी शुभेच्छा दिल्या नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र,  नितेश राणेंनी यानिमित्ताने महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

नितेश राणेंचे ट्विट

महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना ट्विटरवरुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पण, राहुल गांधी यांनी अजूनही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे एकही ट्विट केले नाही, असा दावा नितेश राणेंनी केला. राहुल गांधींनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारे ट्विट केले नव्हते. हा धागा पकडत ही कसली महा विकास आघाडी, अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी 17 नोव्हेंबरला राहुल गांधींनी अभिवादन करणारे ट्विट केले का?, असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला होता.(BJP MLA Nitesh Rane raised question about Rahul Gandhi wishes to Sharad Pawar)

नरेंद्र मोदींकडून शरद पवारांना शुभेच्छा 

नितेश राणेंकडून शिवसेनेवरही निशाणा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनादिवशी राहुल गांधी यांनी अभिवादन करणारे कोणतेही ट्विट केले नव्हते. नितेश राणे यांनी नेमका हाच धागा पकडत आता शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसला वंदनीय असणाऱ्या व्यक्तींचा मान राखताना दिसत आहेत. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले नव्हते, ही बाब नितेश राणेंनी निदर्शनास आणून दिली होती. (BJP MLA Nitesh Rane raised question about Rahul Gandhi wishes to Sharad Pawar)

संबंधित बातम्या: 

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी काँग्रेसश्रेष्ठींनी साधं ट्विटही केलं नाही; नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं

…तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी नारायण राणेंचे ट्विट

(BJP MLA Nitesh Rane raised question about Rahul Gandhi wishes to Sharad Pawar)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें