Nitesh Rane : महाविकास आघाडीचा स्वत: वर विश्वास नाही, मग जनतेनं का ठेवावा, नितेश राणेंचा सवाल

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील चार नगरपंचायत निवडणुकीमध्ये आम्हाला मुळातचं आव्हान नाही, असं राणे म्हणाले.

Nitesh Rane : महाविकास आघाडीचा स्वत: वर विश्वास नाही, मग जनतेनं का ठेवावा, नितेश राणेंचा सवाल
भाजप आमदार नितेश राणे
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 2:10 PM

सिंधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील चार नगरपंचायत निवडणुकीमध्ये आम्हाला मुळातचं आव्हान नाही, असं राणे म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आपापसांत लढत आहेत. राज्यात सत्तेसाठी एकत्र येतात मात्र स्थानिक पातळीवर ती एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. महाविकास आघाडीचा स्वतःवरती विश्वास नाही मग जनतेने का ठेवावा, असा सवाल नितेश राणे यांनी केला.

शिवसेना जोडतोड करुन लढतेय

नगरपंचायत निवडणुकीमध्ये स्वतःच्या हिमतीवर ती शिवसेना निवडून येण्याची ताकद नाही. जोडतोड करून सत्ता घेण्याचा शिवसेना प्रयत्न करते. एकटे निवडून येण्याची क्षमता नाही म्हणून भाजप विरुद्ध एकत्र येऊन ही निवडणूक लढवली जाते. त्यामुळे यातच भाजपचा विजय झालेला आहे.

महाविकास आघाडी सरकारनं मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलंय

आक्रमकता आमच्या रक्तात असल्यामुळे उद्या अधिवेशनात भाजपचे 106 आमदार साथीने महाराष्ट्राच्या हितासाठी नक्कीच लढताना दिसणार आहेत, असं नितेश राणे म्हणाले. अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडी सरकार विदाऊट फुट दिसतंय.कारण मुख्यमंत्री जागेवरती येत नाहीत. कुठेही सरकार अस्तित्वातच दिसत नाही. या सरकारने मिस्टर इंडिया चे घड्याळ घातले असंच वाटतंय कारण कारण गायब झाले सरकार कुठेही दिसत नाहीये, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

पंतप्रधानांचा राजीनामा मागणं हास्यास्पद

नाना पटोले पंतप्रधानांचा राजीनामा मागत आहेत हे हास्यास्पद आहे. ते ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतायेत ते घरी बसले होते. आता तर मुख्यमंत्री गायब झालेत. मुख्यमंत्री घराबाहेर पडले तर ही चॅनेलसाठी ब्रेकिंग न्यूज होते. नाना पटोलेनी मुख्यमंत्र्यांना हलवावं आणि तुम्ही बाहेर पडा आणि जनतेमध्ये दिसा असं सांगावं, असा खोचक सल्ला नितेश राणे यांनी नाना पटोलेंना दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागण्यापर्यंत नाना पटोले यांनी जाऊ नये उजवा आणि डावा बघितलं तर महाराष्ट्राचे नक्कीच भले होईल, असंही नितेश राणे म्हणाले.

इतर बातम्या:

दिल्लीत आज ओबीसी परिषद, लालू, शरद यादव येणार; भुजबळ राजधानीत शक्तीप्रदर्शन करणार?

Bhandara ZP Election | नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यातच बंडखोरी!, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षांसह पाच कार्यकर्त्यांचे का झाले निलंबन?

BJP MLA Nitesh Rane slam Uddhav Thackeray Shivsena and MVA Government

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.