“कर्नाटक विजयाने आत्मविश्वास वाढला, ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळेल”

‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे - जून महिन्यापर्यंत कोसळेल’, असा दावा भाजपचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेतील आमदार गिरीश व्यास (BJP MLC Girish Vyas) यांनी केला.

"कर्नाटक विजयाने आत्मविश्वास वाढला, ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळेल"

नागपूर : कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे – जून महिन्यापर्यंत कोसळेल’, असा दावा भाजपचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेतील आमदार गिरीश व्यास (BJP MLC Girish Vyas) यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. इतकंच नाही तर भाजपनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचंही गिरीश व्यास (BJP MLC Girish Vyas) म्हणाले. कर्नाटक निकालानंतर राज्यातील भाजपच्या गटात हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळेल असा आम्हाला विश्वास आहे, असं गिरीश व्यास यांनी सांगितलं.

कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने तब्बल 12 जागांवर विजय मिळवला. दोन जागा काँग्रेसने तर एक जागा अपक्षने जिंकली. भाजपला कर्नाटकात सत्ता टिकवण्यासाठी 15 पैकी किमान 6 जागांवर विजय मिळवणं आवश्यक होतं. मात्र मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्त्वातील भाजपने तब्बल 12 जागांवर विजय खेचून आणला.

कर्नाटकात काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन केली होती. मात्र कुमारस्वामी यांचं सरकार 13 महिन्यातच कोसळलं. त्यानंतर तिथे येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात भाजपने सरकार स्थापन केलं. आता हाच प्रयोग महाराष्ट्रातही करण्याची तयारी भाजपने केली आहे.

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार दोन महिन्यात कोसळेल आणि भाजप पुन्हा बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.

कोणत्याही क्षणी गोड बातमी – मुनगंटीवार

दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही महाराष्ट्राला कोणत्याही क्षणी गोड बातमी मिळू शकते असा दावा केला आहे. “लवकरच गोड बातमी कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात या महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट म्हणजे या सरकारला कोणत्याही क्षणी स्थिगिती दिली जाऊ शकते”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

संबंधित बातम्या  

अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांची भेट, म्हणजे कोणत्याही क्षणी ‘गोड’ बातमी : सुधीर मुनगंटीवार 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI