Gopichand Padalkar | शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली Gopichand Padalkar calls Sharad Pawar Maharashtras corona

Gopichand Padalkar | शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 1:56 PM

पंढरपूर : भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. (Gopichand Padalkar calls Sharad Pawar Maharashtras corona)

देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात, गोपीचंद पडळकर यांनी केला.

 मुख्यमंत्र्यांनी आषाढीची पूजा करु नये – पडळकर

सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात जर बाहेरील लोक, महाराज मंडळीना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करु नये. सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास महापूजेचा मान द्यावा, असंही यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्या पुण्यात आंदोलन

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या जहरी टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या आंदोलनाची हाक दिली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी शरदराव पवार यांच्याबाबत अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र एखाद्या व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का असा सवाल, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विचारला.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली.

पडळकर सडक्या मानसिकतेचे : महेश तपासे

महाबुध्दीवान… महानिष्ठावान… पक्ष बदलण्याचा अनुभव असलेले गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. (Gopichand Padalkar on Uddhav Thackeray)

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये घरवापसी केली होती. ‘वंचित’कडून लढताना लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना  विधानपरिषदेला संधी दिली.

(Gopichand Padalkar calls Sharad Pawar Maharashtras corona)

संबंधित बातम्या 

उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये : गोपीचंद पडळकर 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.