आजोबांच्या खांद्यावरुन खाली उतरा, गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर बोचरा वार

आजोबांच्या खांद्यावर बसून इतरांना सल्ले देऊ नये," अशी बोचरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. (Gopichand Padalkar Criticism on Rohit Pawar)

आजोबांच्या खांद्यावरुन खाली उतरा, गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर बोचरा वार
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 11:53 AM

अहमदनगर : “गेल्या 50 वर्षांपासून देशाचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. पण या मतदारसंघातील रस्त्यांवर खड्ड्यांचं प्रचंड साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळे रोहित दादांनी इतरांना मोठमोठे सल्ले देण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील रस्ते पाहावेत. आजोबांच्या खांद्यावर बसून इतरांना सल्ले देऊ नये,” अशी बोचरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. (Gopichand Padalkar Criticism on Rohit Pawar)

गोपींचद पडळकरांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर नेमंक काय म्हणाले?

“सध्याचे ५० वर्षांपासून नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत.”

“रोहित पवार रोज टीव्हीवर, ट्वीटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सल्ले देतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्यासारखी वाटते. पण त्यांना माहिती नाही, ते शरद पवारांच्या खांद्यावर बसून त्यांची उंची मोजतात.”

“रोहित दादा, तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल. हा मिरज गावातील रस्ता आहे. तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नसेल आणि तुम्ही देशाच्या नेतृत्वांना जर सल्ले देत असाल तर ते सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील रस्त्यावर प्रचंड रहदारी आहे.”

“या रहदारीत तुम्हाला लोकांचे प्रश्न जाणून घेणं गरजेचं आहे. राज्यात तुमचं सरकार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कर्जत विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करावेत आणि चांगले करावेत आणि त्यानंतर बाकीच्या लोकांना सल्ले द्यावेत”, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. (Gopichand Padalkar Criticism on Rohit Pawar)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या : 

ठाकरे सरकारच्या तीन विकेट निश्चित, पहिली विकेट आव्हाडांची पडणार : किरीट सोमय्या

Maharashtra Unlock | येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार? राजेश टोपेंचे संकेत

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.