AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSR Case to CBI | सामनाचे संपादक तोंडावर पडले, एवढं बोलायला कोणी सांगितलं होतं : नारायण राणे

अनिल देशमुखांच्या मतावर मला बोलायचं नाही," असेही नारायण राणे (Narayan Rane criticizes Sanjay Raut on CBI For Sushant Singh Rajput) म्हणाले.

SSR Case to CBI | सामनाचे संपादक तोंडावर पडले, एवढं बोलायला कोणी सांगितलं होतं : नारायण राणे
| Updated on: Aug 19, 2020 | 8:03 PM
Share

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. हा भारतीय जनतेच्या मनातील निर्णय आहे. लोकांना ही केस सीबीआयकडे जावी हे अपेक्षित होतं. त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला, असे नारायण राणे म्हणाले. यामुळे सामनाचे संपादक तोंडावर पडले आहे, अशी टीका नारायण राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांचे नाव न घेता केली. (Narayan Rane criticizes Sanjay Raut on CBI For Sushant Singh Rajput)

“मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलिसांनी आत्मपरीक्षण करावं,अशाप्रकारचा हा निर्णय आहे. जगात मुंबई पोलिसांचे नाव आहे. ते असताना कोणाच्या तरी सांगण्यावरुन किंवा मदत करण्याच्या हेतूने हे जे काम चालू होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असावा. सुशांतवर, त्याच्या कुटुंबियांवर जो अन्याय होतो आहे. कायद्याचा वापर न करता कायद्याविरोधात कोणाला तरी मदत केली जात आहे. त्यामुळे हा निर्णय झालेला आहे,” असेही राणे म्हणाले.

“यामुळे सामनाचे संपादक तोंडावर पडले आहेत. त्यांनी केस सीबीआयकडे जाण्याचं काम सोप केलं आहे. आता मुंबई, हिंदुत्व, मराठी माणूस असे विषय ते काढणारच. त्यांच्यावर अन्याय होणार. महाराष्ट्रावर अन्याय करत आहे,” अशी टीकाही नारायण राणेंनी केली.

“सुप्रीम कोर्टाला जात, पात, धर्म याचा काय संबंध आहे. तुम्हाला एवढं कोणी बोलायला सांगितलं होतं. मी इथे जाऊ शकतो. मी यांना भेटू शकतो. कोण आहे तू एक खासदार…ते एवढं बोलले. त्यामुळे काम सोप झालं आणि म्हणून अपेक्षित निर्णय आला,” असा टोलाही राणेंनी संजय राऊतांना लगावला.

पवार कुटुंबावर काहीही बोलायचं नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्या ट्विटबाबत नारायण राणे यांना विचारले असता ते म्हणाले, “मी पाहतच नाही. मला पवार कुटुंबाच्या ट्विटवर, प्रतिक्रियेवर काहीही बोलायचं नाही. तसेच अनिल देशमुखांच्या मतावर मला बोलायचं नाही,” असेही ते म्हणाले.

“तपासाची दिशा ही चुकत होती. राज्यसरकार उघडं पडलं आहे. अस्थिर राज्यसरकार उघडं पडलं. त्यांनी आत्मपरिक्षण करावं. हे कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय, यात फायदा कोणाचा आहे. यामुळे जनतेचा विश्वास उडेल. हे दबावामुळेच झालं. नाहीतर मुंबई पोलीस असा निर्णय देऊ शकत नाही. मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे,” अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली. (Narayan Rane criticizes Sanjay Raut on CBI For Sushant Singh Rajput)

संबंधित बातम्या :

मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

SSR Case to CBI | ठाकरे सरकारची दादागिरी संपेल, सोमय्यांचा हल्लाबोल, राणे ते शेलार, विरोधकांचा घणाघात

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.