ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष

लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा बहुमत मिळवून केंद्रात सत्ता स्थापन केली. दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा बहुमत मिळवून केंद्रात सत्ता स्थापन केली. दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसोबत मोदींचे मंत्रिमंडळही स्थापन झाले. यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते, ते म्हणजे लोकसभा अध्यक्ष म्हणून मोदी कोणाची निवड होणार. यासाठी आता मोदींनी ओम बिर्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

लोकसभा अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे. लोकसभा अध्यक्ष पदावरुन अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अनेक भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या नावावर विचार मंथन सुरु होते.

लोकसभा अध्यभ पदासाठी माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालीया आणि डॉ. वीरेंद्र कुमारसारख्या अनेक दिग्गज नेत्यांच्या नावावर चर्चा झाली होती. मात्र मोदींनी बिर्लांच्या नावावर शिक्का मोर्तब केला आहे.

लोकसभेमध्ये भाजपप्रणीत एनडीए सरकारने बहुमत मिळवले आहे, तर विरोधीपक्षापेक्षा अधिक खासदार भाजपचे आहेत. यामुळे ओम बिर्लाच लोकसभा अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओम बिर्ला आजच आपला अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर बुधवारी सभागृहात यावर मतदान होईल.

कोण आहेत ओम बिर्ला?

ओम बिर्ला हे भाजपचे राजस्थानमधील कोटा मतदारसंघाचे खासदार आहेत. बिर्ला दुसऱ्यांदा कोटा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वीही ते राजस्थान विधानसभेत तीन वेळा विजयी झाले होते. बिर्ला यांच्या राजकीय करिअरची सुरुवात विद्यार्थी चळवळीतून झाली. त्यानंतर त्यांनी युवा मोर्चामध्ये काम करण्यास सुरुवात केली.

आमच्यासाठी खूप गर्व आणि आनंदाची बातमी आहे. त्यांना लोकसभा अध्यभ पदासाठी नियुक्ती केल्यामुळे आम्ही खूप आभार व्यक्त करतो, असं बिर्ला यांच्या पत्नी म्हणाल्या.

Published On - 12:24 pm, Tue, 18 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI