Prakash Javadekar: भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री, कोण आहेत प्रकाश जावडेकर?

कोणताही राजकीय गॉडफादर नसताना प्रकाश जावडेकर यांनी स्वत:च्या हिंमतीवर सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री असा प्रवास केला. | Prakash Javdekar

Prakash Javadekar: भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री, कोण आहेत प्रकाश जावडेकर?
प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 4:00 PM

मुंबई: देशात मोदी सरकार आल्यानंतर कायम पक्षश्रेष्ठींच्या मर्जीत राहिलेल्या आणि वेळोवेळी केंद्र सरकारची बाजू समर्थपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आतापर्यंत प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधान मोदी यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे. तसेच अलीकडच्या काळात कोरोना लसीकरणात होणाऱ्या दुजाभावाच्या आरोपांबाबतही प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारची बाजू समर्थपणे लावून धरली होती. (BJP MP Prakash Javdekar Political journey)

पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री हा प्रकाश जावडेकर यांना प्रवास अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. पुणेकर असलेले प्रकाश जावडेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पूर्वीचा जनसंघ आणि भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.

कोण आहेत प्रकाश जावडेकर?

प्रकाश जावडेकर यांचा जन्म 30 जानेवारी 1951 रोजी पुण्यात झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1971 ते 1981 या काळात ते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीला होते. त्यांचा विवाह प्राची जावडेकर यांच्याशी झाला असून या दाम्पत्याला दोन मुले आहेत.

प्रकाश जावडेकर यांचा राजकीय प्रवास?

प्रकाश जावडेकर यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. प्रकाश जावडेकर यांनी दोनवेळा पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 1990 ते 2002 दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. ते महाराष्ट्र सरकारच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते.

अनेक वर्षे महाराष्ट्रात भाजपच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांना केंद्रात बोलावून घेण्यात आले. 2008 साली महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेशातून प्रकाश जावडेकर राज्यसभेवर निवडून गेले. दिल्लीतही त्यांच्यावर भाजपच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून ते ही जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत.

2014 साली लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आले. त्यांच्या मंत्रिमंळामध्ये जावडेकरांची माहिती प्रसारण, संसदीय कामकाज व पर्यावरण ह्या तीन खात्यांवर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरच्या खातेबदलात 5 जुलै 2016 रोजी जावडेकर यांच्याकडे मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली.

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्येही प्रकाश जावडेकर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि भाजपचा प्रवक्ता अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे पर्यावरण खाते आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभारही आहे.

कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेतले अंगावर

कोरोना लसींच्या वाटपावरून केंद्र विरुद्ध राज्य या संघर्षात प्रकाश जावडेकर यांनी मोदी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली होती. महाराष्ट्राला दर आठवड्याला लसीचे 20 लाख डोस देण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली आहे. शिवसेनेच्या खासदारांनीही लसीचे अतिरिक्त डोस महाराष्ट्राला देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. त्यावर, महाराष्ट्राला 54 लाख कोरोनाच्या लसी दिल्या. मग आतापर्यंत केवळ 23 लाख लसींचच लसीकरण का करण्यात आलं?, असा सवाल प्रकाश जावडेकर यांनी उपस्थित केला होता. तसेच महाराष्ट्र सरकारने मोठ्याप्रमाणात लसी फुकट घालवल्याचा आरोपही प्रकाश जावडेकर यांनी केला होता.

(BJP MP Prakash Javdekar Political journey)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.