AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ, सरकार मात्र बदल्या करण्यात खुश : रामदास तडस

महाविकासआघाडी सरकारकडून अद्याप काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप रामदास तडस यांनी केला.(Ramdas Tadas on women molestation cases)

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ, सरकार मात्र बदल्या करण्यात खुश : रामदास तडस
| Updated on: Oct 12, 2020 | 4:19 PM
Share

वर्धा : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार हे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात खूश आहे, अशी टीका भाजप खासदार रामदास तडस यांनी केली आहे. महाराष्ट्र दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. या घटनांचा निषेध करण्याकरिता भाजपाच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार रामदास तडस यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. (Ramdas Tadas on women molestation cases)

राज्यात महाविकासआघाडी सरकार आले त्या काळापासून महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. रोज कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार झाल्याची माहिती मिळते. असे असताना या सरकारकडून अद्याप काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप रामदास तडस यांनी केला.

वर्ध्यातील हिंगणघाट येथील युवतीच्या जळीत प्रकरणाचा निकाल अद्याप लागला नाही. निकाल सोडा ते प्रकरणही अद्याप सुरू झाले नाही. एवढंच नव्हे तर दारूबंदी असलेल्या गडचिरोली,चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात राज्य सरकार दारूबंदी उठविण्याचा विचार करत आहे.

एकीकडे महिला दारूबंदी करण्यासाठी आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे दारुबंदी उठवल्यास महिलांवरील अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होणार आहे. यामुळे या सरकारचा निषेध करत असल्याचं मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केलं आहे.

या आंदोलनाला महिलांसह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मात्र या आंदोलनात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याच चित्र पाहायला मिळालं. (Ramdas Tadas on women molestation cases)

संबंधित बातम्या : 

मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट; सणांसाठी आगाऊ रक्कम आणि LTC कॅश व्हाऊचर्स

वाशिममध्ये पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका, शेतकरी चिंताग्रस्त

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...