ममता हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील? साक्षी महाराज पुन्हा बरळले

डेहराडून : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहाणारे भाजप खासदार साक्षी महाराज हे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. ममता बॅनर्जी या राक्षस हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य साक्षी महाराजांनी केलं. ‘जय श्री राम’ म्हटल्यावर ममता या तुरुंगात पाठवायचं बोलतात, असं तर राक्षस हिरण्यकश्यपू करायचा, …

ममता हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील? साक्षी महाराज पुन्हा बरळले

डेहराडून : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहाणारे भाजप खासदार साक्षी महाराज हे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. ममता बॅनर्जी या राक्षस हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य साक्षी महाराजांनी केलं. ‘जय श्री राम’ म्हटल्यावर ममता या तुरुंगात पाठवायचं बोलतात, असं तर राक्षस हिरण्यकश्यपू करायचा, असं ते म्हणाले.

“पश्चिम बंगालचं नाव ऐकताच मला त्रेता युगाची आठवण होते. जेव्हा राक्षस राज हिरण्यकश्यपूने ‘जय श्री राम’ म्हणण्यावरुन आपल्या मुलाला तुरुंगात टाकलं, त्याला अनेक प्रकारच्या यातना दिल्या. बंगालमध्ये ममता बॅनर्जीही असंच करत आहेत. ‘जय श्री राम’ म्हणण्यावरुन त्या लोकांना तुरुंगात टाकत आहेत. ममता या हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील तर नाही ना?”, असं साक्षी महाराज म्हणाले. हरिद्वारच्या एका सभेत त्यांनी हे आक्षेपार्ह विधान केलं.

“ममता यांचं सरकार हे फुटीरतावादी सरकार आहे. यामुळे बंगालची जनता त्रस्त झाली आहे आणि याची किंमत ममतांना चुकवावी लागेल. विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार येईल, त्यांची हुकुमशाही आता चालणार नाही”, असेही साक्षी महाराज म्हणाले.

भाजप ‘जय श्री राम’चे 10 लाख पोस्टकार्ड ममता बॅनर्जींना पाठवणार

काही दिवसांपूर्वी ममता बनर्जी या ‘जय श्री राम’च्या घोषणेवरुन चिडल्या होत्या. त्यानंतर आता भाजपने ममता बनर्जी यांना ‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे’, असं पश्चिम बंगालचे भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी सांगितलं. गेल्या 30 मे रोजी काही भाजप कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जींसमोर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी ममता बॅनर्जी या चिडल्या आणि त्या भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्या. तर दुसरीकडे काही भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसमोर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या सर्व घटनांनंतर आता अर्जुन सिंह यांनी ममता बॅनर्जी यांना ‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *