Vidarbha Flood | विदर्भातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या, फडणवीसांची सरकारकडे मागणी

पूरग्रस्त भागातील लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि तात्काळ मदतीची मागणी केली.

Vidarbha Flood | विदर्भातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या, फडणवीसांची सरकारकडे मागणी

नागपूर : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली (Devendra Fadnavis Review Flood Situation In Vidarbha) आणि चंद्रपूर जिल्ह्यात महापुरामुळे हाहाःकार उडवला. काही भागात पुराचं पाणी ओसरलं. पण समस्यांचा महापूर कायम आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील पूर नुकसानीची पाहणी केली आणि सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केली (Devendra Fadnavis Review Flood Situation In Vidarbha).

नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर गावाला महापुराचा मोठा फटका बसला आहे. घरांची पडझड झाली, घरात चीखलाचं याम्राज्य आहे. धान्य भीजल्याने लोकांना खायला अन्न नाही. याच गावात आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची पाहणी केली. पूरग्रस्त भागातील लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि तात्काळ मदतीची मागणी केली.

कोल्हापूर आणि सांगलीच्या पुरात ज्याप्रकारे जीआर बदलून तत्कालीन सरकारने मदत केली. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना सरकारनं तात्काळ मदत करावी, सर्व्हेच्या आधी काही रोकड मदत करावी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नागपूर जिल्ह्यातील गावांमधील महापूर आता ओसरला आहे. लोक आपआपल्या गावाला परत गेले. पण, पडलेली घरं आणि वाहून गेलेला संसार पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील झुल्लरचे ज्ञानेश्वर त्यापैकीच एक, मुलं आणि पत्नीला पुरातून बाहेर काढता-काढता जगण्याचा आधार असलेल्या शेळ्या वाहून गेल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पूर नुकसानीची पाहणी केली. तसेच, तात्काळ मदत न केल्यामुळे फडणवीसांनी सरकारवर टीकाही केली.

Devendra Fadnavis Review Flood Situation In Vidarbha

संबंधित बातम्या :

जो उत्साह दारु दुकाने उघडताना दाखवला, त्याच्या अर्धा तरी मंदिरं उघडण्यासाठी दाखवा : देवेंद्र फडणवीस

‘रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, अभ्यास करुन बोलावं’, फडणवीसांचा सल्ला

Published On - 3:16 pm, Wed, 2 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI