माझं तिकीट, माझा मतदारसंघ हिसकावला, असं माझं काही नसतं, सगळं पक्षाचं असतं : चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेच्या तिकीटावरुन (Chandrakant Patil on Medha Kulkarni) पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

माझं तिकीट, माझा मतदारसंघ हिसकावला, असं माझं काही नसतं, सगळं पक्षाचं असतं : चंद्रकांत पाटील

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेच्या तिकीटावरुन (Chandrakant Patil on Medha Kulkarni) पक्षाची भूमिका स्पष्ट केली. टीव्ही 9 मराठीशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, मेधा कुलकर्णी यांना तिकीट का दिलं नाही, याबाबत रोखठोक भूमिका मांडली.

“एकनाथ खडसे यांना पक्षाने खूप काही दिलं आहे, त्यांच्यावर अन्याय झाला असं म्हणता येणार नाही. पंकजा मुंडे समजूतदार आहेत, विधानसभेनंतर लगेचच परिषदेचं तिकीट केंद्राने नाकारलं असेल. तर बावनकुळेंना तिकीट का मिळालं नाही याबाबत आम्ही हैराण आहोत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant Patil on Medha Kulkarni)

मेधा कुलकर्णींना तिकीट का नाही?

यावेळी चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या तिकिटाबाबतही भाष्य केलं. मेधा कुलकर्णी यांना विधानपरिषदेचं आश्वासन देऊनही तिकीट का मिळालं नाही याबाबतची विचारणा केली. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,

“राजकीय पक्षांमध्ये आणि दुर्दैवाने भाजपमध्येसुद्धा माझं तिकीट हा शब्द विकसित झाला तो धोकादायक आहे. तिकीट तुझं नाही, तिकीट पक्षाचं, पक्ष तुला तिकीट देतो. त्यामुळे माझं तिकीट हिसकावून घेतलं, माझी विधानसभा काढून घेतली, असं माझ्या नावाचं काही नसतं. पार्टीने मेहनत करुन पक्ष वाढवलेला असतो, तुमचंही त्यामध्ये योगदान असतं. तुम्ही त्यावेळी उपलब्ध असलेल्यांमध्ये चांगले म्हणून तुम्हाला तिकीट मिळतं. पुढच्या वेळेला उपलब्ध असलेल्यांमध्ये दुसरा चांगला असेल तर त्याला मिळतं. ज्यावेळी तुम्ही नाराज होता त्यावेळी तुम्हाला सांगितलं जातं की काही ना काही तरी करु, तो करण्याचा प्रयत्न होत असतो”

ती न्यायाचीच व्याख्या

यावेळी चंद्रकांत पाटलांनी एक उदाहरणही दिलं. “समजा तुम्हाला ७० हजार पगार आहे, तुमच्या नवऱ्यालाही ७० हजार पगार आहे, म्हणजे महिन्याला १ लाख ४० हजार रुपये उत्पन्न असेल आणि खर्च २ लाख असेल तर त्यावेळी तुम्ही मुलाला म्हणता, पुढच्या महिन्यात तुला शर्ट घे, या महिन्यात सासूबाईंची साडी आधी घेऊ. १ लाख ४० हजारामध्ये २ लाखाचा खर्च भागवता येत नाही. तसं जागा ४ आणि इच्छुक ४०, त्यामुळे कोणाला तरी नाही असं होणारच. न्यायाची व्याख्याच अशी आहे की एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय. तुम्ही माझ्याविरोधात कोर्टात गेला तर तुम्हाला न्याय मिळतो म्हणजे माझ्यावर अन्याय होणारच ना? दोघांनाही न्याय कसा मिळणार?”

वाचा : चंद्रकांत पाटील Exclusive | विधानसभेनंतर लगेच विधानपरिषद तिकीट दिलं नसेल, पंकजा मुंडे मॅच्युअर्ड : चंद्रकांत पाटील

त्यामुळे मी गमतीने म्हणतो, आमच्या कोल्हापुरात महापौरपदासाठी तीन तीन महिन्याचे तुकडे केलेत. तीन महिन्याने महापौर बदलतो. तसं विधानपरिषदेला तीन तीन महिन्याचे तुकडे करा. म्हणजे अधिकाधिक लोकांना समाधानी करता येईल. म्हणजे आताच ४ जागांचे ९६ तुकडे झाले असते. एकाचे २४ आणि ४ चे ९६ तुकडे होतील, सर्वांना आमदारकी देता येईल आणि तीन महिन्यानंतर माजी आमदार असं व्हिजिटिंग कार्डवर लिहिता येईल, आता याशिवाय मला पर्याय दिसत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

(Chandrakant Patil on Medha Kulkarni)

संबंधित बातम्या 

7 वेळा आमदारकी, सुनेला खासदारकी, मुलीला तिकीट, मुलाला उमेदवारी, नाथाभाऊंना आणखी काय हवं? : चंद्रकांत पाटील  

चंद्रकांत पाटील Exclusive | विधानसभेनंतर लगेच विधानपरिषद तिकीट दिलं नसेल, पंकजा मुंडे मॅच्युअर्ड : चंद्रकांत पाटील

Published On - 4:30 pm, Wed, 13 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI