Chandrakant Patil | 'चंपा, टरबुज्या म्हटलं की खपवून घ्यायचं नाही', भाजपच्या नेत्यांवरील शेरेबाजीने चंद्रकांत पाटील भडकले

विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांवर राष्ट्रवादी, मनसे आणि सोशल मीडियावरुन सुरु झालेली शेरेबाजी अजूनही सुरुच आहे.

Chandrakant Patil | 'चंपा, टरबुज्या म्हटलं की खपवून घ्यायचं नाही', भाजपच्या नेत्यांवरील शेरेबाजीने चंद्रकांत पाटील भडकले

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कधी फारसे चिडल्याचं किंवा भडकल्याचं (Chandrakant Patil Get Angry On Their Nicknames) तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. मात्र, भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी नावावरुन शेरेबाजी करणाऱ्यांना इशारा दिला. नावावरुन यापुढे कोणी हिणवलं, की खपवून घ्यायचं नाही, असा आदेशच पाटलांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला (Chandrakant Patil Get Angry On Their Nicknames).

विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांवर राष्ट्रवादी, मनसे आणि सोशल मीडियावरुन सुरु झालेली शेरेबाजी अजूनही सुरुच आहे. यामुळेच आता चंद्रकांतदादा चांगलेच संतापले आहेत. “यापुढे जर चंपा किंवा टरबुज्या कोणी म्हटलं, की थेट पलटवार करायचा”, अशी खुली सूटच पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली.

हेही वाचा : शिवसेनेला उपरती झाली, तर ते येतील, भाजपने हात पुढे केला असे अर्थ काढू नका : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटलांना चंपा म्हणण्याची सुरुवात अजित पवारांनीच केली. विधानसभा निवडणुकीत नावाचा शॉर्टफॉर्म शोधून अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना ‘चंपा’ म्हटलं होतं (Chandrakant Patil Get Angry On Their Nicknames).

अजित पवारांनी चंपा म्हटल्यानंतर राज ठाकरेंनीही पुण्यात चंपा नावाचं चंपी केलं. त्याशिवाय, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना फडणवीसांनी मुख्यमंत्री हा शब्द टाळला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणण्याऐवजी उद्धवजी असा ट्विटवर उल्लेख केल्याने पुन्हा फडणवीसच ट्रोल झाले आणि यामुळे चंद्रकात पाटलांचा संताप भाजपच्या कार्यकारिणीत दिसला.

राजकारणात नेत्याची इमेज फार महत्वाची असते. पण, त्याचवेळी एखादे टोपण नाव पडले की, मग आयुष्यभर त्या टोपण नावाची साथ काही सुटत नाही. त्यामुळे हीच टोपण नावं आता चंद्रकांत पाटलांच्या जिव्हारी लागली आहेत.

Chandrakant Patil Get Angry On Their Nicknames

संबंधित बातम्या :

ना आमचा शिवसेनेला प्रस्ताव, ना शिवसेनेचा आम्हाला : देवेंद्र फडणवीस

“तेव्हा फडणवीसांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का?” अशोक चव्हाणांचा तिरकस सवाल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *