Chandrashekar Bawankule: सत्तेत असताना अजितदादांना सुचलं नाही अन् आता पुतना मावशीच प्रेम आलंय-चंद्रशेखर बावनकुळे

Ajit Pawar: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केलीय. सत्तेत असताना अजितदादांना सुचलं नाही अन् आता पुतना मावशीच प्रेम आलंय, असं ते म्हणालेत.

Chandrashekar Bawankule: सत्तेत असताना अजितदादांना सुचलं नाही अन् आता पुतना मावशीच प्रेम आलंय-चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 10:56 AM

अकोला : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule )यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केलीय. अजित पवार सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मेळ घाटातील समस्यांवर पूर्वीचे आणि आताचे सरकार जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केलीय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना विदर्भाचा दौरा करायला पाहिजे होता. जेव्हा पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार होत तेव्हा पाहिजे होतं. अजित पवार (Ajit Pawar) तेव्हा उपमुख्यमंत्री होते. जेव्हा त्यांचं सरकार होत तेव्हा विदर्भावर अन्याय करायचा. विदर्भातील आदीवासी आणि नक्षल भागात जायचं नाही. विदर्भ वैधानिक मंडळ द्यायचं होत तेव्हा अस म्हटलं की राज्यपालांच्या 12 जागा द्या मग आम्ही विदर्भ वैधानिक मंडळ देवू अन् आता हे पुतना मावशीच प्रेम आलं आहे, अश्या शब्दात बावनकुळे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

“आता मेळघाटात जाऊन बोलत आहेत की फडणवीस सरकार जवाबदार शिंदे सरकार जवाबदार 48 दिवस झाले सरकार आणायला. तुम्ही अडीच वर्ष काय केलं? अडीचवर्ष तुम्ही सत्तेत होता ना अडीचवर्ष तुम्हाला कधी मेळघात आठवलं नाही. अडीच वर्ष तुम्ही कधी नागपूरला अधिवेशन घेतलं नाही. अडीचवर्षे तुमचा मुख्यमंत्री लोकांसाठी एव्हलेबल नव्हता. जेव्हा सत्तेची खुर्ची जातेन तेव्हा अश्या आठवणी येत असतात”, असं म्हणत बावनकुळे यांनी अजितदादांना टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

सत्ता गेली तर आता अचानक दौरे निघतात आणि अचानक प्रश्न ही सुचतात. सत्तेमध्ये बसतो तेव्हाच प्रश्न सोडले पाहिजे. देवेंद्र फडणवीस सरकारला या पूर्वी मागच्या पाचवर्षात फडणवीस सरकारनी विदर्भाला न्याय दिला. मेळघाटाला न्याय दिला आहे. उलट महाविकास आघाडी सरकारनी विदर्भावर अन्याय केला आणी मेळघाटावर अन्याय केला आहे. त्यामुळे आता अजित दादांनी थोडं शांत बसून नवीन सरकारच काम बघितलं पाहिजे, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना दिला आहे.

Non Stop LIVE Update
महिलांना वर्षाला एक लाख रुपये, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
महिलांना वर्षाला एक लाख रुपये, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.