अरविंद सावंत म्हणाले, अमित शहा म्हणजे गजनी, आता मुनगंटीवारांचं तोडीस तोड प्रत्युत्तर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 27, 2021 | 3:58 PM

अमित शाह गजनी आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. अमित शहांना गजनी संबोधण्यापेक्षा निवडणुकीच्या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री संबोधले होते याकडे त्यांनी लक्ष वेधत शिवसेनेवर पलटवार केला आहे.

अरविंद सावंत म्हणाले, अमित शहा म्हणजे गजनी, आता मुनगंटीवारांचं तोडीस तोड प्रत्युत्तर
सुधीर मुनगंटीवार आणि अरविंद सावंत

चंद्रपूर : शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख गजनी असा केला होता. मैने ऐसे कोई बोला नही था, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. अमित शहांना गजनी संबोधण्यापेक्षा निवडणुकीच्या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री संबोधले होते याकडे त्यांनी लक्ष वेधत शिवसेनेवर पलटवार केला आहे.

अमित शहांना गजनी संबोधण्यापेक्षा शिवसेनेने मागील दिवस आठवले तर निवडणुकीच्या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री संबोधले होते हे त्यांच्या लक्षात येईल. पत्रकार परिषदा व बैठकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोदींनी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता, अशी आठवणही मुनगंटीवारांनी यावेळी करुन दिली.

तेव्हा आक्षेप का नाही नोंदवला – सुधीर मुनगंटीवार

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांचा अनेक वेळा मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता, मग शिवसेनेने तेव्हाच याबाबत आक्षेप का नोंदवला नाही? असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला. ज्या गोष्टीबाबत कुणालाही माहिती नाही त्याबाबत असे विधान म्हणजे राजकीय चूक असल्याची टीका त्यांनी केली.

माजी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावरील ईडीच्या धाडीबाबतही सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं. याबाबत राजकारण न करता निर्दोषत्व सिद्ध करणारी माहिती असल्यास त्यांनी ती ईडीकडे देण्याची मागणी मुनगंटीवर म्हणाले. केवळ राजकारण न करता चुका झाल्या नसतील तर अधिकची माहिती यंत्रणांकडे देण्याची गरज असल्याचे मत यावेळी सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केलं.

अमित शहा म्हणजे, ‘मैने ऐसे कोई बोला नही था’!

अरविंद सावंत यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. भाजपला ‘गजनी’सारखा झटका येतो आणि अमित शाह हे गजनी आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले. ते रायगडमध्ये बोलत होते. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी रायगडमध्येच बोलताना काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. मात्र आता अरविंद सावंत यांनी अमित शाहांवरच निशाणा साधल्यामुळे, शिवसेना-भाजप युतीबाबत सुरु असलेल्या चर्चा पुन्हा थांबल्या.

माथेरान नगरपरिषदेतील कर्मचारी वर्गाने शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेच्या कामगार युनियनमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला अरविंद सावंत हजर होते. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

अरविंद सावंत काय म्हणाले?

मैने ऐसे कोई बोला नही था, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी असेल, पण उद्धवजी मात्र रामशास्त्री बाण्याचं काम करणारे आमचे नेतृत्व आहे हे लक्षात ठेवा, असं अरविंद सावंत म्हणाले. शिवसेना-भाजपच्या युतीबाबत काय घडलं होतं, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, असा रोख अरविंद सावंत यांचा होता.

हे ही वाचा :

मैने ऐसे कोई बोला नही था, अमित शाह म्हणजे गजनी, अरविंद सावंत यांचा हल्लाबोल

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI