संजय राठोड यांना चपलेनं झोडला पाहिजे; चित्रा वाघ यांचा घणाघात, पुणे पोलिसांवरही गंभीर आरोप

संजय राठोड यांना आधी चपलेनं झोडपा पाहिजे. त्याच बलात्कारी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री बसत आहेत ही लाजिरवाणी बाब असल्याचा घणाघात चित्रा वाघ यांनी केलाय.

संजय राठोड यांना चपलेनं झोडला पाहिजे; चित्रा वाघ यांचा घणाघात, पुणे पोलिसांवरही गंभीर आरोप
Chitra Wagh And Sanjay Rathod
सागर जोशी

|

Feb 24, 2021 | 4:04 PM

मुंबई : भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राठोड यांना आधी चपलेनं झोडपा पाहिजे. त्याच बलात्कारी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री बसत आहेत ही लाजिरवाणी बाब असल्याचा घणाघात चित्रा वाघ यांनी केलाय. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांवरही त्यांनी गंभीर आरोप केला आहे. पुणे पोलिसांच्या तपासावर सुरुवातीपासूनच संशय होता, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे.(BJP vice president Chitra Wagh criticizes Sanjay Rathod)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ज्या दोन तरुणांना जुजबी चौकशी करुन सोडून देण्यात आलं. त्यापैकी एकही तरुण पोलिसांच्या ताब्यात नाही. पोलिसांनी या तपासात संपूर्णपणे दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. पुणे पोलिसांकडून राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाखल केलेला अहवाल ही महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात केलेली धुळफेक असल्याचंही चित्रा वाघ मंगळवारी म्हणाल्या होत्या.

‘संजय राठोड यांचा चपलेनं झोडलं पाहिजे’

राज्य सरकारमध्ये सध्या बलात्कारी मंत्र्यांना आणि नेत्यांना वाचवण्याची चढाओढ सुरु आहे. सगळं माहिती असूनही मुख्यमंत्री काहीच करु शकत नाहीत? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे. संजय राठोडला आधी चपलेनं झोडलं पाहिजे. त्याच बलात्कारी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री बसत आहेत, ही लाजिरवाणी बाब आहे. एवढं सगळं करुनही हा मंत्री आता कसलीही लाज न बाळगता समोर फिरतो आहे. आजवर मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, असं वाटत होतं. पण याच बलात्कारी मंत्र्याला पाठीमागे घालायचं काम ते करत आहेत, असा आरोपही चित्रा वाघ यांनी केलाय. संजय राठोड या बलात्कारी आणि हत्याऱ्याला बाहेर हाकला, असं मुख्यमंत्र्यांना हात जोडून आवाहन असल्याचंही चित्रा वाघ म्हणाल्या.

“महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड”

“स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड सध्या राजकारणात आला आहे. मात्र संजय राठोड (Sanjay Rathod) हा पूजा चव्हाणचा (Pooja Chavan suicide) हत्यारा आहे, त्याच्या मुसक्या आवळायलाच हव्यात, असा हल्लाबोल चित्र वाघ यांनी मंगळवारी केला होता. “आपण निर्दोष आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड यांनी केला. संजय राठोड त्यांनी केलेल्या पापाची कबुली करण्यासाठी ते बंजारा समाजाच्या काशीमध्ये गेले. समाजाला एकत्रित करुन घोषणाबाजी केली गेली. दोन फरार मुलांपैकी एका मुलाचा सुगावा लागला. संजय राठोडांचा शहाणपणा गेले पंधरा दिवस कुठे होता. दोन पैकी एक मुलगा फरार आहे. एक मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे. बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळ्या मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. संजय राठोडांच्या मुसक्या सरकारनं आवळायला हव्या”, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

संजय राठोड हत्यारा, स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल 

Pooja Chavan Case : कुठं कुठं जायाचं? कुलू, मनाली, शिमला, गबरुशेठची एन्ट्री आणि मंत्री महोदय, आणखी एक Audio clip

BJP vice president Chitra Wagh criticizes Sanjay Rathod

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें