AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ट्विस्ट, भाजपची माघार महाविकास आघाडीपुढं नव्या पॅनेलचं आव्हान

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपनं नाट्यमयरित्या सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले आहेत.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ट्विस्ट, भाजपची माघार महाविकास आघाडीपुढं नव्या पॅनेलचं आव्हान
जळगाव जिल्हा बँक
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 4:04 PM
Share

जळगाव: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपनं नाट्यमयरित्या सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले आहेत. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय समविचारी व दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत विकास शेतकरी पॅनेलची स्थापना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचं वर्चस्व जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आलं आहे.

महाविकास आघाडीसमोर शेतकरी पॅनेलचं आव्हान

भाजपने जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यानंतर महा विकास आघाडी जिल्हा बँकेवर सत्तास्थापनेसाठी मार्ग मोकळा झालाय असं वाटत असतानाचं नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या समोर आता शेतकरी पॅनेलचे आव्हान निर्माण झालंय.

भाजपकडून बहिष्कार टाकत माघार

जळगाव जिल्हा बँकेत 21 जागांसाठी निवडणूक होणार होती यात भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने महा विकास आघाडी तील 11 उमेदवार बिनविरोध झाले. आता 10 जागांसाठी मतदान होत असताना सर्वपक्षीय प्रस्थापितांनी विकास शेतकरी पॅनेल च्या माध्यमातून ही निवडणूक चुरशीची केली आहे. एकनाथ खडसे यांनी यांनी पूर्ण पॅनेल आपल्या ताब्यात कसे राहील व चेअरमन पद आपल्याकडे कसा राहील यासाठी सोयीचे महाविकास आघाडीतील सोयीचे उमेदवार निवडले असल्याचा आरोप प्रस्थापित कार्यकर्त्यांनी केला आहे.

जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला 11 जागा

जळगाव जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले असून राष्ट्रवादी 11, शिवसेना 7, काँग्रेस 3 अशा जागा देण्यात आल्या आहेत. महिला राखीवमधून एका जागेची काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसच्या या मागणीवर चर्चेअंती निर्णय होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा बँक संचालक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी शनिवारी विश्रामगृहात बैठक घेण्यात आली होती.

इतर बातम्या:

SMAT 2021: अजिंक्य रहाणेची वादळी खेळी, पृथ्वी शॉची साथ, मुंबईची बडोद्यावर 82 धावांनी मात

Anil Parab PC LIVE | जनतेला वेठीस धरणं योग्य नाही, अनिल परबांचं एसटी कामगारांना चर्चेचं आवाहन

BJP withdraw all candidates forms during Jalgaon District Co operative bank ltd now another panel fight with MVA

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.