शिवबंधन बांधणाऱ्या सरकारने खुर्ची रिकामी करावी, भाजपची महिला आघाडी आक्रमक

लातूर जिल्ह्यातील कोपरामध्ये महिलेला मारहाण करुन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उमा खापरे यांनी केला. (BJP Uma Khapre on Thackeray Government)

शिवबंधन बांधणाऱ्या सरकारने खुर्ची रिकामी करावी, भाजपची महिला आघाडी आक्रमक
uddhav thackeray

लातूर : राज्यात महिला सुरक्षित नाहीत. महिलांचं संरक्षण करता येत नसेल, तर शिवबंधन बांधणाऱ्या सरकारने खुर्ची रिकामी करावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे (Uma Khapre) यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या कोपरा आणि बीड जिल्ह्यातल्या बर्दापूर येथील दोघी पीडित महिलांची भेट घेतल्यानंतर त्या लातूरमध्ये बोलत होत्या. (BJP Women’s Wing Chief Uma Khapre criticizes Thackeray Government in Latur)

लातूर जिल्ह्यातील कोपरामध्ये महिलेला मारहाण करुन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उमा खापरे यांनी यावेळी केला. पोलिसांवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळेच राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत, असं त्या म्हणाल्या.

धनंजय मुंडे प्रकरणीही उमा खापरेंकडून हल्लाबोल

कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतल्यानंतर भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर दबावाच्या राजकारणाचा आरोप केला होता. “आधीपासून तिच्यावर तक्रार मागे घेण्यासंबंधी दबाव होता. त्यामुळे तिने तक्रार मागे घेतल्याचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. आमचा मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या बायकोचा उल्लेख तसंच तिच्यापासून झालेल्या दोन मुलांचा उल्लेख केला नाही, ते कायद्याच्या परिघाबाहेर आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी” अशी मागणी उमा खापरे यांनी केली होती.

हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला होता.

“हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य”

“सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजप महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल” असे पत्र उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.

संबंधित बातम्या :

हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, भाजप महिला आघाडी आक्रमक

…म्हणून रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे, भाजप नेत्या उमा खापरेंचा मोठा गौप्यस्फोट

(BJP Women’s Wing Chief Uma Khapre criticizes Thackeray Government in Latur)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI