दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनातही भाजप आक्रमक राहणार, भाजपच्या बैठकीत काय रणनिती ठरली?

अधिवेशनाच्या दोन दिवसांत शेतकरी, कोरोना ते आरक्षण या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारण्याचं काम आम्ही करु, असं शेलार म्हणाले. त्यामुळे दोन दिवसाच्या अधिवेशनातही सरकारला कोंडित पकडण्याची रणनिती भाजपनं आखल्याचं दिसून येत आहे.

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनातही भाजप आक्रमक राहणार, भाजपच्या बैठकीत काय रणनिती ठरली?
आशिष शेलार, भाजप आमदार


मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला कोण-कोणत्या विषयांवर कोंडित पकडायचं, या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचं कळतंय. शेतकरी, कोरोना ते आरक्षण अशा सर्व विषयांना न्याय देण्याबाबत आम्ही रणनिती ठरवल्याचं या बैठकीनंतर आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं. (BJP’s strategy to trap the Mahavikas Aghadi government in the Monsoon session)

राज्यासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहे. संपूर्ण अधिवेशन झालं असतं तर सर्व विषयांना न्याय देता आला असता. पण सरकारनं यापेक्षा अजून छोटं अधिवेशन ठेवता येत नाही की काय म्हणून दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं आहे, असा टोला शेलार यांनी लगावलाय. त्याचबरोबर अधिवेशनाच्या दोन दिवसांत शेतकरी, कोरोना ते आरक्षण या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारण्याचं काम आम्ही करु, असं शेलार म्हणाले. त्यामुळे दोन दिवसाच्या अधिवेशनातही सरकारला कोंडित पकडण्याची रणनिती भाजपनं आखल्याचं दिसून येत आहे.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रणनिती

नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीतही पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणेच विजय मिळवण्याचा निर्धार भाजपनं केलाय. त्यासाठीही या बैठकीत रणनिती आखण्यात आल्याचं शेलार यांनी म्हटलंय.

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, मलिकांचा दावा

आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल. मात्र, आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केलाय. माध्यमांशी बोलताना मलिक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही टोला लगावला आहे. विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सुचवलं आहे. निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसाचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरु असल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

‘मी मंत्रीपदाची मागणी केलेली नाही, जी जबाबदारी देतील ते पार पाडेन’, नाना पटोलेंकडून स्पष्ट

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : काँग्रेसने आता नावही फोडलं? अध्यक्षपदासाठी पुण्यातील आमदार आघाडीवर

BJP’s strategy to trap the Mahavikas Aghadi government in the Monsoon session

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI