तेजस्वी सूर्या यंदाचा सर्वात युवा खासदार

Nupur Chilkulwar

| Edited By: |

Updated on: May 24, 2019 | 9:13 PM

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये यावेळी 26 ते 35 या वयोगटातील अनेक तरुण उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र, 23 मे रोजी लागलेल्या निकालांनंतर या तरुण उमेदवारांपैकी केवळ दोन उमेदवार यशस्वी होऊ शकले. यामध्ये दक्षिण कर्नाटकमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले तेजस्वी सूर्या हे यंदाचे सर्वात कमी वयाचे खासदार बनले आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री अनंत कुमार […]

तेजस्वी सूर्या यंदाचा सर्वात युवा खासदार

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये यावेळी 26 ते 35 या वयोगटातील अनेक तरुण उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र, 23 मे रोजी लागलेल्या निकालांनंतर या तरुण उमेदवारांपैकी केवळ दोन उमेदवार यशस्वी होऊ शकले. यामध्ये दक्षिण कर्नाटकमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले तेजस्वी सूर्या हे यंदाचे सर्वात कमी वयाचे खासदार बनले आहेत.

भाजपचे केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवरुन म्हणजेच दक्षिण बंगळुरु मतदारसंघातून त्यांच्या पत्नींना तिकीट मिळणार होतं. मात्र, भाजपने तेजस्वी सूर्या यांना तिकीट देऊन एक तरुण चेहरा मतदारांसमोर आणला. मोदी लाट आणि तेजस्वी सूर्या यांची लोकप्रियता भाजपसाठी फायद्याची ठरली. अखेर तेजस्वी सूर्या जिंकले. त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बीके प्रसाद यांना तीन लाख 31 हजार मतांच्या फरकाने हरवलं.

कर्नाटकमधूनच आणखी एक युवा चेहरा खासदार बनला आहे. जनता दल सेक्युलरचे प्रमुख एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांनीही निवडणूक जिंकून खासदारकी मिळवली आहे. प्रज्वल रेवन्ना हे 29 वर्षांचे आहेत. त्यांनी कर्नाटकच्या हासन लोकसभा मतदारसंघातून एक लाख 41 हजार 324 मतांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या एकाच  मतदारसंघात जनता दल सेक्युलर हा पक्ष जिंकून आला आहे.

हे उमेदवार अयशस्वी ठरले

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कमी वयाचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, ते सर्व यशस्वी होऊ शकले नाहीत. दक्षिण दिल्ली मतदारसंघातून आपने राघव चड्ढा यांना उमेदवारी दिली. मात्र, भाजपचे उमेदवार रमेश बिधूडी यांनी साडे तीन लाख मतांच्या फरकाने राघव चड्ढा यांना पराभूत केलं. हिसार येथून काँग्रसने 26 वर्षीय भव्य विश्नोईला संधी दिली. मात्र, त्यांना भाजपच्या बिजेंद्र सिंहांनी चार लाख मतांच्या फरकाने हरलवलं. तर माकपचे 26 वर्षीय बिराज डेका हे काकरझोर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, त्यांना अपक्ष उमेदवार एमके सरानिया यांना पराभूत केलं.

तरुण खासदार किती?

लोकसभा निवडणूक 2014 मध्ये 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे 32 खासदार जिंकून आले होते. मात्र, यंदा हा आकडा 23 वर येऊन पोहोचला आहे. आज देशात सर्वाधिक तरुण वर्ग आहे. मात्र तरीही लोकसभा निवडणुकांमध्ये 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे केवळ 2.2 टक्के खासदार बनतात. स्वातंत्र्यानंतर ते आतापर्यंत लोकसभा निवडणुकांमध्ये जास्त वयाच्या खासदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे तरुण उमेदवार निवडूण येत नाहीत. तसेच भारतातील राजकीय पक्षही 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या उमेदवारांना निवडणुकीत सहभागी होण्याची फार कमी संधी देतात. त्यामुळे देशात तरुण नेतृत्त्व बघायला मिळत नाही.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI