AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेसाठी भाजपनं कंबर कसली! निवडणुकासाठी समित्यांची नियुक्ती, जाणून घ्या ‘कुणाच्या खांद्यावर कोणतं ओझं’?

भाजपनं मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु केलीय. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या एकूण 25 समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार आशिष शेलार यांच्यात नेतृत्वाखाली यंदाची महापालिका निवडणूक भाजप लढणार असल्याचं स्पष्ट झालंय.

मुंबई महापालिकेसाठी भाजपनं कंबर कसली! निवडणुकासाठी समित्यांची नियुक्ती, जाणून घ्या 'कुणाच्या खांद्यावर कोणतं ओझं'?
मुंबई महापालिका निवडणूक, आशिष शेलार
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 11:36 PM
Share

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) तोंडावर सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं आता कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून घोषणांचा सपाटाच लावण्यात आलाय. त्यात 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांची मालमत्ता करमाफी (Property Tax) असेल किंवा महापालिकेच्या अर्थसंकल्पातील अनेक घोषणा. तर दुसरीकडे भाजप शिवसेनेला घेरण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. आता भाजपनं मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु केलीय. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या एकूण 25 समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात नेतृत्वाखाली यंदाची महापालिका निवडणूक भाजप लढणार असल्याचं स्पष्ट झालंय.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन समित्या गठित करण्यात आल्या आहे. या निवडणुक संचालन समितीमध्ये खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन आणि मनोज कोटक आणि किरीट सोमय्या हे विशेष आमंत्रित असतील अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

समितीचे नाव, प्रमुख आणि समितीच्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे :

निवडणूक संचालन समिती

आशिष शेलार, अध्यक्ष राहुल नार्वेकर कालिदास कोळंबकर प्रकाश मेहता नितेश राणे पुनम महाजन

जाहिरनामा समिती

पुनम महाजन, अध्यक्ष योगेश सागर, सचिव सुनील राणे आर. यू. सिंह राजहंस सिंह प्रभाकर शिंदे

प्रशासन समन्वय समिती

प्रविण दरेकर

प्रसार माध्यम आणि समाज माध्यम समिती

अतुल भातखळकर, अध्यक्ष राम कदम अमरजीत मिश्रा विवेकानंद गुप्ता

झोपडपट्टी संपर्क समिती

गोपाळ शेट्टी आर. डी. यादव तृप्ती सावंत

संसाधन समिती

मनोज कोटक

आरोपपत्र समिती

अमित साटम, अध्यक्ष भालचंद्र शिरसाट विनोद मिश्रा

बाह्य प्रसिद्धी समिती

पराग अळवणी

प्रसिद्धी सामुग्री व्यवस्थापन समिती

मिहिर कोटेचा पराग शाह

बुथ संपर्क समिती

संजय उपाध्याय

निवडणूक आयोग संपर्क समिती

प्रकाश मेहता कृपाशंकर सिंह

ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क समिती

भाई गिरकर

जाहीर सभा समिती

प्रसाद लाड

वॉर रुम समिती

प्रतिक क्रर्पे

ओबीसी संपर्क समिती

मनिषा चौधरी

उत्तर भारतीय संपर्क समिती

आर. यू. सिंह जयप्रकाश ठाकूर अमरजित सिंह जयप्रकाश सिंह ज्ञानमूर्ती शर्मा

इतर बातम्या :

ट्रॅफिकमुळेच 3 टक्के घटस्फोट होतात, हा जावईशोध कुठून लावला? विरोधकांच्या प्रश्नाला मिसेस फडणवीसांचं पुराव्यासह उत्तर

नितेश राणे प्रकृती बिघडली? रुग्णालयात ठेवलं जाण्याची शक्यता; तर प्रकृती अस्वास्थ्यावरुन वैभव नाईकांचा जोरदार टोला

‘पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार’, सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊतांचं वक्तव्य

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.