बीएमसीत शिंदे गटाची ताकद वाढली! अजून एक माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर, वडाळ्यात शिवसेनेला धक्का
BMC Election 2022 : अमेय घोले शिंदे गटात सहभागी होणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. अमेय घोले हे शिवसेनेच्या युवा सेनेच्या कोअर टीमचे सदस्यदेखील आहेत. त्यामुळे त्यांच्या शिंदे गटात जाण्याने बीएमसीतही शिवसेना फुटणार की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

मुंबई : मुंबई महानगर पालिकेवर आतापर्यंत शिवसेनेचं (Shiv sena Politics in BMC Election 2022) निर्विवाद वर्चस्व राहिलंय. पण 2022 च्या पालिका निवडणुकीत मुंबई पालिकेत आपली सत्ता राखण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामध्ये शिवसेनेला पूर्णपणे खिंडार पडलंय. अशातच वडाळ्यातून (Vadala Mumbai) मुंबई पालिकेचा आणखी एक माजी शिवसेना नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवस सुरु होत्या. या चर्चांवर अखेर पडदा पडलाय. मुंबई पालिकेतील शिवसेनाचा अजून एक नगरसेवत शिंदे गटात सामील होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे ठाकरेंना मुंबईच्या वडाळातून मोठा धक्का बसलाय.
वडाळ्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवकर अमेय घोले ये शिंदे गटात जाणार, अशी कुजबूज गेले अनेक दिवस सुरु होती. पण आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. वडाळ्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच माजी सेना नगरसेवक अमेय घोले यांनी जंगी स्वागत केलं. सोमवारी मध्यरात्री करण्यात आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या वडाळ्यातील जंगी स्वागतने अनेक गोष्टी अधोरेखित केल्या.
अखेर चर्चांना पूर्णविराम
अमेय घोले शिंदे गटात सहभागी होणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. अमेय घोले हे शिवसेनेच्या युवा सेनेच्या कोअर टीमचे सदस्यदेखील आहेत. त्यामुळे त्यांच्या शिंदे गटात जाण्याने बीएमसीतही शिवसेना फुटणार की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
शीतल म्हात्रे यांच्यानंतर आता अमेय घोले हे शिंदे गटात सामील होणारे शिवसेनेचे मुंबई पालिकेतील दुसरे माजी नगरसेवक आहेत. आता आणखी किती नगरसेवक शिवसेनेऐवजी शिंदे गटाला समर्थन देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बीएमसीत चुरस
मुंबई पालिकेत शिंदे आणि भाजप एकत्र निवडणूक लढतं का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याांनी मिशन 150 चा नारा दिला आहे. त्यामुळे भाजप पालिका निवडणुकीत स्वबळावर लढते की काय, अशी चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला अंतर्गत स्पर्धेचा सामना करतानाह सत्ता राखण्याचंही आव्हान असणार आहे.
शिंदेना मात देणं, भाजपशी दोन हात करणं, या सगळ्यात असलेल्या नगरसेवकांना टिकवून ठेवणं, अशी तिहेरी कसरत मुंबई महापालिकेत शिवसेनेला करावी लागतेय. यात नेमकं यश शिंदे गटाला येतं, शिवसेनेला येता की भाजपला फायदा होतो, हे येणारा काळच ठरवेल.
