AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना नव्हे, काँग्रेसमुळे बीएमसीत भाजपची अडचण

शिवसेनेसोबतची युती तुटल्याने भाजपची राज्यातील सत्ता गेली. त्यापाठोपाठ मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सत्तेतूनही भाजपला बाहेर व्हावं लागलं (BMC opposition leader issue).

शिवसेना नव्हे, काँग्रेसमुळे बीएमसीत भाजपची अडचण
| Updated on: Jan 24, 2020 | 8:29 PM
Share

मुंबई : शिवसेनेसोबतची युती तुटल्याने भाजपची राज्यातील सत्ता गेली. त्यापाठोपाठ मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सत्तेतूनही भाजपला बाहेर व्हावं लागलं (BMC opposition leader issue). विशेष म्हणजे बीएमसीची सत्ता जाऊनही भाजपला येथे विरोधी पक्षनेतेपदासाठीही अजून प्रतीक्षाच करावी लागत आहे. काँग्रेसने बीएमसीचं विरोधी पक्षनेतेपद सोडल्यानंतरच भाजपला संधी मिळणार आहे (BMC opposition leader issue). या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई महानगरपालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावणाऱ्या भाजपनं आता विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. मात्र काँग्रेसनं हे पद सोडल्याशिवाय भाजपला विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर विराजमान होता येणार नाही. त्यामुळे भाजपला आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. त्यावेळी 227 नगरसेवकांपैकी शिवसेनेचे 85, भाजपचे 82, काँग्रेसचे 31, राष्ट्रवादीचे 9, समाजवादी पक्षाचे 6, एमआयएमचे 2, अखिल भारतीय सेनेचे 1 नगरसेवक आणि इतर अपक्ष नगरसेवक निवडून आले होते.

भाजपने शिवसेनेच्या बाजूने मतदान केल्याने शिवसेनेचा महापौर झाला. यावेळी विरोधी पक्षनेत्याची निवड करताना सर्वात मोठा असलेल्या दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जात होते. मात्र, भाजपने आपण पालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावणार असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार नाही असं स्पष्ट केलं. त्यामुळे तिसऱ्या मोठ्या पक्षाला म्हणजेच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळालं.

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरुन शिवसेना-भाजप युती तुटली. राज्यातील 25 वर्ष एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी महाआघाडी करुन सरकार स्थापन केलं. त्यामुळे मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावणाऱ्या भाजपनं आता विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच असेल असं जाहीर वक्तव्य भाजपचे राम कदम यांनी केलं आहे. पालिकेच्या पहारेकऱ्यांची भूमिका सोडून आता विरोधीपक्ष नेतेपदासाठी भाजपकडून दावा केला जात आहे. असं असलं तरी सध्या भाजपला हे पद देण्यासाठी पालिकेच्या कायद्यात तशी तरतूदच नसल्यानं भाजपला विरोधीपक्ष नेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भाजपकडून विरोधीपक्ष नेतेपदावर दावा केला जाणार आहे. मात्र पालिकेच्या नियमानुसार एखाद्या पक्षाला विरोधीपक्ष नेतेपद दिले असल्यास तो पक्ष जोपर्यंत विरोधीपक्ष नेतेपदावरील आपला दावा सोडत नाही, तोपर्यंत इतर पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद देता येत नाही. या नियमानुसार काँग्रेसला महाविकास आघाडी म्हणून सत्तेत सहभागी व्हावं लागेल किंवा विरोधी पक्षनेते पदावरुन दावा सोडावा लागेल. मात्र, सध्या तरी काँग्रेसची तशी भूमिका नाही. येत्या एप्रिल महिन्यात पालिकेतील वैधानिक, विशेष आणि प्रभाग समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष यांनी एकत्र येऊन लढल्यास भाजपला आपोआप विरोधी पक्ष नेते पद मिळणार आहे. मात्र तोपर्यंत भाजपला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पालिकेतील पक्षीय बलाबल –

शिवसेना –      95 भाजप –          83 काँग्रेस –         29 राष्ट्रवादी –      08 समाजवादी –  06 मनसे –           01 एमआयएम –  02

यावर बोलताना बीएमसीचे सध्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा म्हणाले, “मी सध्या विरोधी पक्ष नेते पदावर आहे. मला पदावरुन काढून भाजपचा विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही. आमच्या काँग्रेस पक्षाने पालिकेत सत्तेत जायचा निर्णय घेतला तरच भाजपला हे पद मिळू शकते.”

पालिका गटनेते आणि आमदार रईस शेख म्हणाले, “भाजपने 2 वर्षांपूर्वीच विरोधी पक्षनेते पद नाकारले आहे. त्यांना मनात येते तेव्हा ते सत्तेच्या बाजूने असतात, तर कधी विरोधात जातात. भाजपने गेल्या 2 वर्षात मुंबईकरांचे कोणतेही प्रश्न पालिकेत मांडलेले नाहीत. भाजप पालिकेत पूर्णपणे अपयशी ठरली असल्याने त्यांना विरोधी पक्षनेते पद देणं चुकीचं ठरेल.

संबंधित बातम्या :

ईडीची धाड, बीएमसीच्या माजी अधिकाऱ्याकडे घबाड, दुबईतही घर

दाऊदला हादरवणारा बीएमसीचा ‘डॅशिंग’ माजी अधिकारी काँग्रेसला झुंजवणार

कोस्टल रोडचं काम थांबल्यानं दररोज 10 कोटींचं नुकसान, बीएमसी सर्वोच्च न्यायालयात

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.