Eknath Shinde : माझ्याकडे 40 आमदार! नवा गटही स्थापला, मुंबईच्या येण्याची तयारी, ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी एकनाथ शिंदेंची 3 मोठी वक्तव्य

एकनाथ शिंदे विशेष विमानानं मुंबईत येणार असल्याची माहिती आहे.

Eknath Shinde : माझ्याकडे 40 आमदार! नवा गटही स्थापला, मुंबईच्या येण्याची तयारी, ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी एकनाथ शिंदेंची 3 मोठी वक्तव्य
एकनाथ शिंदेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 7:23 AM

गुवाहाटी :  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाकरे सरकार आणि पर्यायाणे शिवसेनेला (Shivsena) धक्क्यांवर धक्के देत आहेत. आता गुवाहाटी याठिकाणी गेलेला एकनाथ शिंदे यांचा गट अधिक सक्रिय झाला असून या आमदारांपैकी (MLA) अनेकांनी माध्यमांशी बोलताना जय महाराष्ट्र असं म्हटलंय. तर एकनाथ शिंदे  विशेष विमानानं मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. राज्यपालांची  शिंदे भेट घेणार आहेत. यामुळे शिंदे गटाचे ठाकरे सरकारला धक्क्यांवर धक्के बसत असल्याचं दिसतंय. यातच आता मोठी माहिती समोर आली असून एकनाथ शिंदे दुपारनंतर मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. यावेळी शिंदे राज्यपाल महोदयांना भेटणार असल्याची माहिती आहे. यावेळी माझ्यासोबत मोठा गट असल्याची माहिती ते राज्यपालांना देणार आहेत.  शिंदे नेमकं काय म्हणालेत, याचे  तीन अर्थ जाणून घ्या…

माझ्याकडे 40 आमदार :

आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे. त्यासाठी ते मुंबईमध्ये दुपारी येतील. राज्यपालांची भेट घेतली, असंही सांगितलं जातं आहे. एका विशेष विमानाने एकनाथ शिंदे हे मुंबईला येणार असल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा

खरी शिवसेना हीच :

दरम्यान खरी शिवसेना ही आपल्यासोबत आहे, असंही ते म्हणालेत. यामुळे शिवसेनेसोबतच्या सर्व वाटाघाटी फोल ठरल्याचंही आता स्पष्ट झालंय. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फोनवरील संवादातून तोडगा निघालेला नसून आता परिस्थिती शिवसेनेच्या हाताबाहेर जात असल्याचंही सांगितलं जातंय. किती आमदार एकनाथ शिंदेकडे आहे, यावरुन शंका उपस्थित केली जात होता. संजय राऊत यांनी देखील मंगळवारी बोलताना अप्रत्यक्षपणे संख्याबळ मोजण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आता शिवसेनेतच उभी फूट पडल्याचंही एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानं अधोरेखित झालंय.

बाळासाहेब ठाकरेंचा पुन्हा उल्लेख :

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख आतापर्यंत तीनवेळा एकानाथ शिंदे यांनी केला. शिवसेना सोडणार नाही, असं ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. म्हणजेच ते शिवसेनेतून बाहेर पडणार नाहीतच, असंही स्पष्ट झालंय. आता शिवसेना त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करते का, हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पहिल्यांदा ट्वीटमधून, त्यानंतर मंगळवारी रात्री सूरत इथे माध्यमांशी बोलताना, आणि त्यानंतर आज गुवाहाटी विमानतळावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी केलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख महत्त्वाचा मानला जातोय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.