AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC election 2022 Ward No 149 Chheda Nagar : वॉर्ड क्रमांक 149 मध्ये परिवर्तन होणार का? शिवसेना भाजपकडून विजयश्री खेचून आणणार का?

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यंदाची महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. वॉर्ड क्रमांक 149 ची निवडणूक देखील चुरशीची होणार आहे. या वॉर्डात भाजपला सुषम गोपाळ सावंत यांनी केलेली विकासकामे विजयश्री खेचून आणण्यास मदत करताहेत कि शिवसेना किंवा काँग्रेस आणखी जोर लावून गेल्या निवडणुकीतील विजयाचे स्वप्न पूर्ण करताहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

BMC election 2022 Ward No 149 Chheda Nagar : वॉर्ड क्रमांक 149 मध्ये परिवर्तन होणार का? शिवसेना भाजपकडून विजयश्री खेचून आणणार का?
वॉर्ड क्रमांक 149 मध्ये परिवर्तन होणार का? Image Credit source: TV9
| Updated on: Jun 08, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका अशी मुंबई महापालिकेची ओळख आहे. यंदा याच श्रीमंत महापालिकेची निवडणूक (Election) होत आहे. या निवडणुकीत आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख पक्ष जोरदार तयारीने रिंगणात उतरत आहेत. ही निवडणूकही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता आहे. हिंदुत्वा (Hindusm)चा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी राहू शकतो. त्याच अनुषंगाने प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची निश्चिती केली जात आहे. निवडणूक कार्यक्रमांतर्गत नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यात काही दिग्गज नेत्यांना अपेक्षित आरक्षण न पडल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. ते उमेदवार सुरक्षित मतदारसंघांचा शोध घेत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यंदाची महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. वॉर्ड क्रमांक 149 ची निवडणूक देखील चुरशीची होणार आहे. या वॉर्डात भाजपला सुषम गोपाळ सावंत (Susham Gopal Sawant) यांनी केलेली विकासकामे विजयश्री खेचून आणण्यास मदत करताहेत कि शिवसेना किंवा काँग्रेस आणखी जोर लावून गेल्या निवडणुकीतील विजयाचे स्वप्न पूर्ण करताहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मागच्या निवडणुकीत नेमके चित्र काय होते?

2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे सुषम गोपाळ सावंत यांनी 5927 मते मिळवून विजय संपादित केला होता. मात्र हा विजय मिळवताना शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपची दमछाक केली होती. त्यावेळी शिवसेनेचे संजय ईश्वर कदम यांनी दुसऱ्या क्रमांकाची 3808 मते मिळवली होती, तर तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रीय काँग्रेसच्या यतीन रवींद्र साळवी यांनी 3233 मतदारांची पसंती मिळवली होती. मनसेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. मनसेचे राजीव सुमंत चौगुले यांना 2973 मते मिळाली होती. त्याशिवाय बहुजन समाज पक्षाचे कटारनवरे राजेश केरू, किरण वसंत शिरवळकर (अपक्ष), पुत्रन वसंत संजीव (अपक्ष), ज्ञानेश्वर कोंडाजी काळे (अपक्ष), हेमा विष्णू बांदेकर (अपक्ष) यांच्यात मते विभागली गेली होती. अपक्ष उमेदवार गणेश रामरूप अवस्थी यांनी 2903 मिळवून सर्वच प्रमुख पक्षांना मोठा धक्का दिला होता.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

मतदारसंख्येची गोळाबेरीज

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 22569 इतकी वैध मते पडली होती. वॉर्डातील एकूण लोकसंख्या 49983 इतकी असून त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4750 आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या 673 इतकी आहे. मागच्या निवडणुकीत भाजपचे सुषम सावंत सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आले होते.

वॉर्डमध्ये नेमके कोणकोणते भाग येतात?

चेंबूर परिसरातील वॉर्ड क्रमांक 149 मध्ये टिळक नगर, इंदिरा नगर झोपडपट्टी, चेडानगर, पेस्तमसागर कॉलनी या प्रमुख भागांचा समावेश आहे. झोपडपट्टी वस्तीतील समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे भाजपची याच मुद्द्यावरून शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कोंडी करतात का, ते पाहावे लागेल.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.