शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांना घरचा आहेर, धाकटे बंधू संजय जाधवांनी थोपटले दंड! बॅनर लावून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

खासदार प्रतापराव जाधव शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र यांचे धाकटे बंधू संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना एका वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि शहरात फलक लावून शुभेच्छा दिल्या आहेत.

शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांना घरचा आहेर, धाकटे बंधू संजय जाधवांनी थोपटले दंड! बॅनर लावून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा
खासदार प्रतापराव जाधव शिंदे रटात, भाऊ संजय जाधवकडून ठाकरेंना शुभेच्छाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 1:34 PM

बुलडाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) वाढदिवस बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रभर साजरा झाला. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्यासह दोन आमदार शिंदे गटात गेले आहेत. असं असताना खासदार जाधव यांचे धाकटेबंधू, माजी नगराध्यक्ष संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सगळीकडे फलक लाऊन आणि वृत्तपत्रात जाहिरात देऊन धुमधडाक्यात साजरा केलाय. हे फलक म्हणजे अभेद्य ‘प्रताप’ गडाला हादरा समजायचा की गनिमी कावा खेळून दोन्ही सेना आपल्या कुटुंबात ठेवायची ही राजकीय खेळी तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. तसंच संजय जाधव यांनी खासदार भावाविरोधातच दंड थोपटले तर नाही ना? अशीची चर्चा सध्या सुरु आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील दोन शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामील झाले. त्या पाठोपाठ 12 खासदारांनी देखील शिंदे गटात समावेश केला. त्यात बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे अग्रस्थानी होते. त्यानंतर मात्र बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेला मोठे भगदाड पडणार असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यानंतर काही दिवसातच घाटाखालील एका शिवसेना जिल्हाप्रमुखाने पत्रकार परिषद घेऊन आम्ही पदाधिकारी आणि शिवसैनिक खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत शिंदे गटात असल्याचे जाहीर केले होते. परंतु काही दिवसातच इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरे सोबतच आहोत आणि त्यांच्या सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने शिंदे गटातील पदाधिकारी तोंडघशी पडले होते.

संजय जाधवांकडून ठाकरेंना बॅनर लावून शुभेच्छा

त्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी मेहकर, चिखली, सिंदखेड राजा या ठिकाणी बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करून, शिवसैनिकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र नुकताच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाल्याने त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामध्ये मेहकरचे शिवसेनेचे दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेले आणि खासदार प्रतापराव जाधव यांचे धाकटे बंधू संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना एका वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि शहरात फलक लावून शुभेच्छा दिल्या आहेत. या जाहिरातीमध्ये जिल्हा शिवसेनाप्रमुख बळीराम मापारी यांचाही फोटो होता. त्यामुळे खासदाराचे बंधूच त्यांच्यासोबत नसल्याने संजय जाधव यांनी प्रतापराव जाधव यांना घरचा आहेर दिल्याची जिल्ह्यात सुरु आहे.

जाधव परिवारात दोन गट की राजकीय खेळी?

संजय जाधव यांनी लावलेले फलक पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत. मोठे बंधू प्रतापराव जाधव यांच्या भूमिकेशी फारकत घेऊन संजय जाधव हे उद्धव ठाकरेंसोबत जाणे म्हणजे ‘प्रतापगडा’ला खरंच हादरा म्हणायचं की खासदारांची राजकीय खेळी? अशीही एक चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात सुरु आहे.

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.