AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख शिवसेनेत, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बविआला धक्का

पंकज देशमुख यांच्यासोबत वसई तालुक्यातील इतर समाजातील चार प्रमुख नेत्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. (Pankaj Deshmukh joins Shivsena )

क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख शिवसेनेत, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बविआला धक्का
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'वर्षा' निवासस्थानी पंकज देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश
| Updated on: Feb 16, 2021 | 3:14 PM
Share

मुंबई : बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख (Pankaj Deshmukh) यांनी शिवबंधन हाती बांधले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख रवींद्र पाठक उपस्थित होते. ‘बविआ’चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जातो. (BVA Leader Pankaj Deshmukh joins Shivsena in presence of CM Uddhav Thackeray)

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात केलेलं काम पाहून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया पंकज देशमुख यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. पंकज देशमुख यांच्यासोबत वसई तालुक्यातील इतर समाजातील चार प्रमुख नेत्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. आदिवासी एकता परिषदचे दत्ता सांबरे, प्रकाश जाधव, वंदना जाधव आणि जन आंदोलन समितीचे गॉडसन रॉड्रिक्स यांनी शिवसेनेचा झेंडा हाती धरला.

कोण आहेत पंकज देशमुख?

पंकज देशमुख हे बहुजन विकास आघाडीचे माजी उपमहापौर आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उमेश नाईक यांचे नातेवाईक आहेत. तर माजी सभापती निलेश देशमुख यांचे चुलतभाऊ आहेत. पंकज देशमुख यांचे नालासोपारा शहरात युवा कार्यकर्त्यांचे मोठे संघटन आहे. येत्या महापालिका निवडणुकीत सत्ताधारी बविआला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

फेसबुक पोस्ट लिहित बविआला रामराम

पंकज देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी फेसबुक पोस्ट लिहित बहुजन विकास आघाडीला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करणं निश्चित मानलं जात होतं. आगामी वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जातं.

काय होती फेसबुक पोस्ट?

“गेल्या एक दशकाहून अधिक काळ समाजकारणाला प्रथम प्राधान्य देणाऱ्या बहुजन विकास आघाडी पक्ष परिवारात हितेंद्र ठाकूर, राजीव पाटील, उमेश नाईक, क्षितीज ठाकूर, सिद्धार्थ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत एक पक्ष कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत होतो. या पक्षात संपूर्ण क्षमतेने कार्य करण्याची बहुमोल संधी मला दिल्याबद्दल पक्षनेतृत्व, सर्व जेष्ठ नेतेमंडळी, नगरसेवक आणि सहकार्य केल्याबद्दल सर्व आजी माजी महिला, पुरुष व युवा पदाधिकारी, सहकारी, हितचिंतक मित्र परिवार आणि वेळोवेळी तसेच कठीणसमयी भक्कम पाठिंबा आणि मार्गदर्शनरुपी राजकीय साथ दिलेल्या कुटूंबियांचे शतशः जाहीर आभार.  (BVA Leader Pankaj Deshmukh joins Shivsena in presence of CM Uddhav Thackeray)

सदर कार्यकाळात कळत नकळत माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची मनःपूर्वक क्षमा मागतो. मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून व्यक्तिगत जीवनात आपले प्रेम, नातेसंबंध, आपुलकी यापुढेही अशीच कायम राहील.

-पंकज देशमुख

संबंधित बातम्या :

बहुजन विकास आघाडीला धक्का, क्षितिज ठाकूरांच्या खंद्या समर्थकाचा अलविदा, नवा पक्ष ठरला?

बविआचा भाजपला पाठिंबा नाही : क्षितीज ठाकूर

(BVA Leader Pankaj Deshmukh joins Shivsena in presence of CM Uddhav Thackeray)

BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.