Byelection Results 2022: दिल्लीमध्ये पुन्हा केजरीवाल; उत्तर प्रदेशात अखिलेश यांना धक्का, जाणून घ्या देशभरातल्या पोटनिवडणुकांचे निकाल

आज लोकसभा आणि विधान सभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पंजाबमध्ये आपला धक्का बसला आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने सपाचा गड काबीज केला आहे.

Byelection Results 2022: दिल्लीमध्ये पुन्हा केजरीवाल; उत्तर प्रदेशात अखिलेश यांना धक्का, जाणून घ्या देशभरातल्या पोटनिवडणुकांचे निकाल
अजय देशपांडे

|

Jun 26, 2022 | 3:39 PM

नवी दिल्ली : आज विधानसभा (Assembly constituency) आणि लोकसभेच्या जांगासाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी (Byelection) मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आम आदमी पार्टीने बाजी मारली आहे. राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवार दुर्गेश पाठक (Durgesh Pathak) हे विजयी झाले आहेत. त्यांनी या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राजेश भाटिया यांचा पराभव करत 11555 मतांच्या फरकाने विजय मिळवला. राघव चड्ढा यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याने त्यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजेंद्र नगर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात आली. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशात दोन्ही लोकसभेच्या जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून भाजपाचे उमेदवार घनश्याम लोधी हे विजयी झाले आहेत, तर आझमगडमधून भाजपाचे दिनेश लाल यादव यांचा विजय जवळपास निश्चित मानण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

जाणून घेऊयात देशभरातील पोटनिवडणुंकांचे निकाल

  1. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवार दुर्गेश पाठक हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या राजेश भाटिया यांचा 11555 मतांनी पराभाव केला. राघव चड्ढा यांनी राजीनामा दिल्यामुळे या मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात आली.
  2. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीला भाजपाने धक्का दिला आहे. रामपूरमधून भाजपाचे उमेदवार घनश्याम लोधी हे विजयी झाले आहेत, तर आझमगडमधून भाजपाचे दिनेश लाल यादव हे आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे हे दोनही लोकसभा मतदारसंघ अखिलेश यादव यांचा गड माणण्यात येतात. मात्र इथे भाजपाने विजय मिळवला आहे.
  3. दिल्लीमध्ये आपचा विजय झाला आहे, मात्र पंजाबमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबच्या संगरूर लोकसभा मतदारसंघातून शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार सिमरनजीत सिंग मान यांचा विजय झाला. त्यांनी आपच्या उमेदवाराचा पराभव केला. सिमरनजीत सिंग मान या सात हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.
  4. त्रिपुरामध्ये बरदोवली टाउन विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री माणिक साह हे विजयी झाले आहेत. त्यांनी 6,000 पेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवला. त्यांना मुख्यमंत्री पद टीकून ठेवण्यासाठी हा विजय आवश्यक होता.
  5. झारखंडच्या मंदार विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या शिल्पी नेहा टिर्की या आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित माणण्यात येत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें