कॅबिनेट बैठकीला आलेल्या मंत्र्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, आल्या पावली मंत्रालयातून माघारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Minister Dilip Walse-Patil Tested Corona Positive)

कॅबिनेट बैठकीला आलेल्या मंत्र्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, आल्या पावली मंत्रालयातून माघारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणीचा रिपोर्ट येण्यापूर्वी त्यांनी मंत्रालयात हजेरी लावली होती. वळसे पाटील यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच इतर मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. (Minister Dilip Walse-Patil Tested Corona Positive)

राज्यातील मंत्र्यांची आज (29 ऑक्टोबर) मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील मंत्रालयात दाखल झाले. मात्र कॅबिनेट बैठकीपूर्वी त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी जराही वेळ न घालवता तातडीने घरी जाण्याचा निर्णय घेतला.

दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. ते थोड्या वेळातच रुग्णालयात दाखल होणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकवर्तीयांनी दिली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि  रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे.

फडणवीसांवर प्लाझ्मा थेरेपी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं रेमडीसिव्हिरचा डोस देण्यात आला आहे. तसंच फडणवीस यांच्यावर पहिली प्लाझ्मा थेरेपी करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अजितदादांचीही प्रकृती चांगली असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. (Minister Dilip Walse-Patil Tested Corona Positive)

संबंधित बातम्या :

दादा लढवय्ये, लवकर बरे व्हा, सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांना सदिच्छा

काळजी करु नका, अजित पवार लवकरच महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील: अमोल मिटकरी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI