विधानपरिषद | मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने दिलेली 12 सदस्यांची यादी राज्यपालांना नाकारता येते का?

विधानपरिषद | मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने दिलेली 12 सदस्यांची यादी राज्यपालांना नाकारता येते का?

राज्यपालांनी किती वेळात निर्णय घ्यावा, हे लिहिलेलं नाही. मात्र जास्त वेळ घेणं चुकीचं असल्याचं उल्हास बापट म्हणाले

अनिश बेंद्रे

|

Nov 07, 2020 | 2:36 PM

पुणे : विधानपरिषदेवर (Vidhan Parishad) कोणाला घ्यायचं, हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवतं आणि त्या नावांची यादी राज्यपालांकडे देतं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा निर्णय हा राज्यपालांवर बंधनकारक आहे, अशी माहिती घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी दिली. विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या बारा जागांसाठी मंत्रिमंडळाने यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली. (Can Governor reject list of Governor Elected Vidhan Parishad MLC given my CM and Ministry)

केंद्राप्रमाणे राज्यातही संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा निर्णय राज्यपालांवर बंधनकारक आहे. विधानपरिषदेवर कोणाला घ्यायचं हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवतं आणि त्या नावांची यादी राज्यपालांकडे देतं. राज्यपालांना 167 कलमाखाली सल्ला देता येतो, माहिती विचारता येते किंवा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करता येते. पण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांनी घेतलेला निर्णय बदलता येत नाही, अशी माहिती उल्हास बापट यांनी दिली.

राज्यपालांनी घटनेप्रमाणे वागायचं ठरवलं, तर त्यांना मंत्रिमंडळाने दिलेली यादी स्वीकारावी लागेल. राज्यपालपद स्वीकारताना त्यांनी घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली आहे. राज्यपालांनी किती वेळात निर्णय घ्यायचा हे लिहिलेलं नाही. पण त्यांनी जास्त वेळ लावणं चुकीचं आहे, असं मतही उल्हास बापट यांनी व्यक्त केलं.

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा
2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा
3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा
4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा
2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा
3) यशपाल भिंगे – साहित्य
4) आनंद शिंदे – कला

(Can Governor reject list of Governor Elected Vidhan Parishad MLC given my CM and Ministry)

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला
2) नितीन बानगुडे पाटील –
3) विजय करंजकर –
4) चंद्रकांत रघुवंशी –

संबंधित बातम्या :

उर्मिला आणि नितीन बानुगडे विधानपरिषदेवर, शिवसेनेची चार नावं ठरली !

 निष्ठावान शिवसैनिकाला विधान परिषदेचं बक्षीस, विजय करंजकर यांची उमेदवारी निश्चित

विधानपरिषद : राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, शेट्टी, आनंद शिंदेंचं नाव, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे

(Can Governor reject list of Governor Elected Vidhan Parishad MLC given my CM and Ministry)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें