LIVE : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अशी लढाई सुरु झाली आहे. शारदा चिटफंड घोटाळ्यावरुन सीबीआय आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार आमने-सामने आले आहेत. कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आता त्या पाच अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. […]

LIVE : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:30 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अशी लढाई सुरु झाली आहे. शारदा चिटफंड घोटाळ्यावरुन सीबीआय आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार आमने-सामने आले आहेत. कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आता त्या पाच अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोदी सरकार विरोधात धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. त्यामुळे सध्या देशात मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी असे चित्र आहे आणि आता या वादात इतर नेत्यांनीही उडी घेण्यास सुरुवात केली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला कुणा-कुणाचा पाठिंबा?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनात उतरले आहेत, तर अरविंद केजरीवाल हे आज ममता बॅनर्जींना भेटायला जाण्याची शक्यता आहे.

काल नेमकं काय झालं?

रविवारी (3 फेब्रुवारी) संध्याकाळी सीबीआयचे अधिकारी रोज व्हॅली आणि शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी तपासाकरीता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचले. मात्र, त्यांना बाहेरच अडवण्यात आले. एसआयटी टीमचे नेतृत्व करत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने कागदपत्र आणि फाईल्स गमावल्याबद्दल तपास करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी आयुक्तांच्या घरी पोहोचले होते. याबाबत त्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र त्याचे काहीही उत्तर आले नाही. त्यानंतर काल (3 फेब्रुवारी) छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

शारदा चिटफंड घोटाळा नेमका काय आहे?

एप्रिल 2013 मध्येच हा घोटाळा उघडकीस आला होता. सुमारे 10 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची शारदा ग्रुपने फसवणूक केल्याचा आरोप आहे. अंदाजे 2 हजार 460 कोटींचा शारदा चिटफंड घोटाळा असल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालमधील शारदा ग्रुप या चिटफंड कंपनीने लोकांची फसवणूक केली, त्यासाठी आकर्षित करणाऱ्या ऑफर कंपनीकडून देण्यात आल्या. 15 महिन्यात पैसे दुप्पट मिळतील, यांसारख्या ऑफरचा यात समावेश होता. चार कंपन्यांच्या माध्यमातून अशा ऑफर देण्यात आल्या. मात्र, ज्यावेळी पैसे परत करण्याची वेळ आली, त्यावेळी या कंपन्यांना टाळे होते.

घोटाळ्याचं टीएमसी कनेक्शन काय आहे?

शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुणाल घोष यांचं नाव समोर आल्यानंतर, या घोटाळ्याला राजकीय वळण लागलं. कुणाल घोष यांनी या घोटाळ्यात तीन वर्षांचा तुरुंगवासही भोगला आहे. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. कुणाल घोष यांनीच या घोटाळ्यात टीएमसीच्या इतर बड्या नेत्यांवर आरोप केले आहेत. तसेच, या घोटाळ्याच्या चौकशीवेळी एसआयटीचे अध्यक्ष राजीव कुमार होते. सध्या ते कोलकात्याचे पोलिस आयुक्त आहेत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.