भुजबळांवर धमकीचे आरोप, म्हणाले टेकचंदानींशी 10 वर्षांपासून…

मी हिंदु, राष्ट्रप्रेमी, भाजपचा आहे, असं ते म्हणतायत. पण मला तर ते काम करताना दिसले नाही. मी त्यांना मेसेज पाठवण्याचं कामच नाही, असं म्हणत भुजबळ यांनी टेकचंदानींचे आरोप फेटाळून लावलेत.

भुजबळांवर धमकीचे आरोप, म्हणाले टेकचंदानींशी 10 वर्षांपासून...
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी

|

Oct 01, 2022 | 4:01 PM

चंदन पूजाधिकारी, नाशिकः माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी सरस्वती (Saraswati) देवीबद्दल जे वक्तव्य केलं. त्यासंदर्भातील एक व्हिडिओ  मी भुजबळांना पाठवला. त्यानंतर मला धमकीचे फोन सुरु झाले. असा आरोप चेंबूरचे व्यावसायिक ललित टेकचंदानी (Lalit Tekchandani) यांनी केलाय. मात्र टेकचंदानी यांना मी 8 ते 10 वर्षांपासून बोललोच नाहीये, असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिलंय. त्यांनी केलेले आरोप छगन भुजबळ यांनी फेटाळून लावलेत. मला मुद्दाम त्रास दिला जातोय, असा आरोपही त्यांनी केला.

चेंबूरचे व्यावसायिक ललित टेकचंदानी यांनी छगन भुजबळांविरोधात तक्रार केली आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झालाय.

भुजबळांना त्यांच्याच वक्तव्यासंदर्भात एक व्हिडिओ मी पाठवला. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या सुरु केल्या, असा आरोप टेकचंदानी यांनी केलाय.

भुजबळ यांनी सरस्वती देवीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी टेकचंदानी यांनी केली आहे.

तर छगन भुजबळ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. सध्याच्या स्थितीत मला त्रास देण्याचा हा प्रयत्न असल्याचं भुजबळ म्हणालेत.

मी हिंदु, राष्ट्रप्रेमी, भाजपचा आहे, असं ते म्हणतायत. पण मला तर ते काम करताना दिसले नाही. मी त्यांना मेसेज पाठवण्याचं कामच नाही.

त्यांना 8-10 वर्षांपासून बोललोच नाही. व्हॉट्सअपवर मी त्यांचा फोटो निरखून पाहिल्यानंतर ते तीच व्यक्ती असल्याचं कळलं. एवढाच विषय आहे, असं भुजबळ म्हणाले.

 

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें