रोहित पवारांची विधानसभा उमेदवारी धोक्यात

रोहित पवारांनी लोकसभेला माघार घेतानाच विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले होते. नुकताच त्यांनी पक्षाकडे रितसर अर्ज करुन कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणीही  केली. मात्र, त्यांची ही उमेदवारी आता धोक्यात आली आहे.

रोहित पवारांची विधानसभा उमेदवारी धोक्यात
Follow us
| Updated on: Jul 18, 2019 | 12:37 PM

अहमदनगर: महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पवार कुटुंबीयांची तिसरी पीढी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. यात तिसऱ्या पीढीतील एक म्हणजे पार्थ पवार आणि दुसरे म्हणजे रोहित पवार. पार्थ पवारांनी लोकसभेत आपलं नशीब आजमावलं, मात्र, संपूर्ण ताकद लावूनही त्यांचा दारुण पराभव झाला. दुसरीकडे रोहित पवारांनी लोकसभेला माघार घेतानाच विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले होते. नुकताच त्यांनी पक्षाकडे रितसर अर्ज करुन कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणीही  केली. मात्र, त्यांची ही उमेदवारी आता धोक्यात आली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी देखील आघाडीचा निर्णय घेतला आहे. मात्र, जागावाटपावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होत असल्याचे दिसत आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचा असून काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिल्याने रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे. जामखेडची जागा यापूर्वी काँग्रेसनेच लढवली होती. त्यामुळे आम्ही ही जागा सोडणार नाही. ही जागा यापुढेही काँग्रेसच लढवेल, असं ठाम मत काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केलं. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी देखील उमेदवारीची मागणी केली आहे.

बाळासाहेब साळुंखे यांच्या या नव्या वक्तव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीतील स्थानिक पातळीवरचे मतभेद पुन्हा समोर आले आहेत. यामुळे नव्या वादालाही तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता यातून मार्ग कसा काढायचा हाच मोठा प्रश्न आणि आव्हान रोहित पवारांच्या समोर आहे.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.