शरद पवारांनी नैतिकता पाळावी, चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा; चंद्रकांतदादा मागणीवर ठाम

शरद पवारांनी नैतिकता पाळावी, चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा; चंद्रकांतदादा मागणीवर ठाम

पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेने भ्रमनिरास झाला, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (Chandrakant Patil Comment on Dhananjay Munde Rape Allegation)

Namrata Patil

|

Jan 16, 2021 | 4:43 PM

पुणे : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नैतिकता पाळावी. सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा,”  अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. “शरद पवारांनी धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर आहेत, असे म्हटलं होते. शरद पवार कडक धोरण स्वीकारतात. त्यांनी 50 वर्षाच्या जीवनात आरोप झाल्यानंतर त्या व्यक्तीला पाठीशी घातले असे झाले नाही, पण पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेने भ्रमनिरास झाला,” असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (Chandrakant Patil Comment on Dhananjay Munde Rape Allegation)

“सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. ते कडक धोरण स्वीकारतात. गेल्या 50 वर्षाच्या जीवनात आरोप झाल्यानंतर त्याला पाठीशी घातले असे झाले नाही. पण पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेने भ्रमनिरास झाला. नैतिकतेची चाड पवार साहेबांकडून अपेक्षित आहे. भारतीय राजकारणात अशी घटना घडल्यानंतर राजीनामा देण्याची कृती झालेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

“करुणा शर्मा आणि रेणू शर्मा हे दोन विषय वेगळे आहेत. रेणू शर्माने जाळ्यात ओढले त्याची चौकशी जरूर करा.
पण रेणूची बहिण तिच्या संबंधातून मुले झाली. त्याबाबत राजीनामा द्यावा,” असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

“1984 मध्ये रामराव आदिक यांच्याविरोधात हवाईसुंदरीने तक्रार केलीही.  2009 मध्ये राज्यपालांनाही आक्षेपार्ह चित्रफीतीमुळे पद सोडावं लागलं होतं,” अशी काही उदाहरणंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

भाजपचा आक्रमक पावित्रा 

“धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांची चौकशी सुरु राहील, पण रेणू शर्मा यांनी केलेले आरोप गंभीर आहेत, यामुळे राजीनामा देण्याची मागणी केली होती. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर भाजप महिला मोर्चा सोमवारपासून जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करु. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निवेदन देऊ,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant Patil Comment on Dhananjay Munde Rape Allegation)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदाराचा मोदींविरोधात शड्डू, लोकसभेला आव्हान देण्याची तयारी

धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत; राजकीय मदतीचा प्रश्नच नाही: कृष्णा हेगडे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें