AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो मुख्यमंत्र्यांना ऐकू जात नाही’, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरुन महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय.

'अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो मुख्यमंत्र्यांना ऐकू जात नाही', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 26, 2021 | 8:20 PM
Share

पनवेल : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरुन महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. “छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकायला जात नाही,” अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. ते पनवेलमधील शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते. त्यांनी आज (26 मार्च) उरण, पनवेल आणि खारघर याठिकाणी शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका घेतल्या (Chandrakant Patil criticize MVA government and Uddhav Thackeray over crime against women).

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होत आहेत. नुकतेच मेळघाटामध्ये एका महिला वनाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याला कोण जबाबदार आहे? महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. संवेदना नसलेल्या या भ्रष्ट सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.”

या सरकारचे भीषण स्वरूप भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचवले पाहिजे, असं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था तर ‘न घर का न घाट का’, असं म्हणत टोला लगावला.

या बैठकीला माजी खासदार ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल, प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनंद पटवर्धन, जिल्‍हा संघटन सरचिटणीस अविनाश सोनी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. पण हे सरकार बेभान होऊन केवळ आपले गुन्हे आणि भ्रष्टाचार लपविण्यामागे व्यस्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे जरा डोळे उघडून हा आलेख बघा म्हणजे तुम्हाला राज्यावर येणाऱ्या मोठ्या संकटाची जाणीव होईल.”

“राज्य सरकारच्या बेफिकर कारभाराची शिक्षा जनतेला देणे चूक आहे. तुम्ही व्यवस्थापनात कमी पडलात म्हणून पुन्हा लॉकडाऊन लावून जनतेला वेठीस धरू नका. लॉकडाऊन लावायचा असल्यास जनतेच्या उदरनिर्वाहाची समस्या राज्य सरकारने प्रथम सोडवावी,”

हेही वाचा :

वडील गिरणी कामगार, चाळीत बालपण गेलं; चंद्रकांतदादांविषयी हे माहीत आहे का?

मग परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टातील याचिका खोटी आहे का?; चंद्रकांतदादांचा वर्मावर घाव

‘राठोडांचा राजीनामा, वाझे निलंबित; पण अनिल देशमुखांना वाचवलं; उद्धवजी, शरद पवार शिवसेना संपवतायत’

व्हिडीओ पाहा :

Chandrakant Patil criticize MVA government and Uddhav Thackeray over crime against women

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या