AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही, संजय राऊतांसारखा कंपाऊंडरही नाही’, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

चंद्रकांत पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार टीकाटिप्पणी सुरु आहे. आता कोरोना निर्बंधांवरुनही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. ते आज औरंगाबादेत बोलत होते.

'मी उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही, संजय राऊतांसारखा कंपाऊंडरही नाही', चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
| Edited By: sagar joshi | Updated on: Sep 04, 2021 | 8:21 PM
Share

औरंगाबाद : नारायण राणेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, राणेंना झालेली अटक आणि सुटका, त्यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध भाजपात जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार टीकाटिप्पणी सुरु आहे. आता कोरोना निर्बंधांवरुनही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. ते आज औरंगाबादेत बोलत होते. (Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray, MP Sanjay Raut over Corona third wave)

‘कोरोनाची तिसरी लाट येणार नाही हे भाकीत करण्यासाठी मी काही उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही. तिसरी लाट येऊ शकते का नाही हे माहीत नाही. पण कोव्हीड फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो माझ्याशी बोलत नाही’, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे. यापूर्वी राज्यातील मंदिरे उघडण्यावरुनही चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आम्ही समोरून कोथळा काढतो- संजय राऊत

शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्हाला बाळासाहेबांनी हे घाणेरडं काम कधीच शिकवलं नाही, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चंद्रकांतदादांवर चढवला.

आम्ही शिवाजी महाराजांची औलाद आहोत. अफजल खानाचा कोथळा पुढून काढलेला आहे. जो कोणी असेल तो. शाहिस्ते खानाची बोटं समोरून तोडली आहेत. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे घाणेरडं काम कधी शिकवलं नाही. काय असेल ते समोरून. पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा शिवसेनेची नाही, असं सांगतानाच पाठीत खंजीर आमच्या खुपसलेला आहे. शब्द आम्ही नाही फिरवला नाही. शब्द तुम्ही फिरवला आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

चंद्रकांत पाटलांचा पलटवार

आम्ही पाठीत खंजीर खूपसत नाही. समोरून कोथळा बाहेर काढतो, संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही चांगलाच समाचार घेतला. हम किसी को टोकेंगे नही, अगर किसीने टोका तो छोडेंगे नही, असं पाटील म्हणाले. संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे काय अॅक्शन घेणार आहेत हे त्यांनी सांगावं. नारायण राणेंनी एक थोबाडीत मारली असती तर असं म्हटलं होतं. त्यावर त्यांना अटक केली. मग कोथळा काढला असता किंवा कोथळा काढू यावर काय करणार आहात? हे उद्धव ठाकरेंनी ठरवावं, असं पाटील म्हणाले.

इतर बातम्या :

‘पवार आमचे मार्गदर्शक, पण खेडमध्ये वळवळणाऱ्या किड्यांचा बंदोबस्त करु’, संजय राऊतांचा घणाघात

Video : अजितदादांच्या कार्यक्रमात दारुड्याची एन्ट्री! दादा म्हणाले, लोक दुपारीच चंद्रावर जायला लागले… माझ्या तालुक्यात दारु धंदे नको

Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray, MP Sanjay Raut over Corona third wave

Follow Us
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा