नाथाभाऊ, तुम्ही पक्षात राहा, मला जायला सांगा : चंद्रकांत पाटील

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचं दुःख आम्ही समजू शकतो. मात्र भविष्यात जेव्हा सगळं चांगलं होईल तेव्हा तुम्हाला अपराधी वाटता कामा नये, की त्यावेळी आपण काय बोलून गेलो? असं चंद्रकांत पाटील बोलले

नाथाभाऊ, तुम्ही पक्षात राहा, मला जायला सांगा : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Dec 12, 2019 | 5:00 PM

बीड : नाथाभाऊ, तुम्ही पक्षातून बाहेर जाण्याची किंवा स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा करु नका. तुम्ही बोला की तू काल आला आहेस, आम्ही पक्षातच राहणार, तू जायचं तर जा, पक्षात राहून संघर्ष करा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना केलं. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात पाटील (Chandrakant Patil on Eknath Khadse) बोलत होते.

नाथाभाऊ, आपल्या तक्रारी आणि व्यथांची दखल घेईन, त्यावर उत्तर काढू. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचं दुःख आम्ही समजू शकतो. मात्र भविष्यात जेव्हा सगळं चांगलं होईल तेव्हा तुम्हाला अपराधी वाटता कामा नये, की त्यावेळी आपण काय बोलून गेलो? मराठी शब्द संवेदनशील असतात, त्यामुळे ते वापरताना थोडे जपून वापरा. काही घटना नक्की घडल्या मात्र त्यांचा विचार होईल आणि त्यावर योग्य ते उपाय योजले जातील, असं आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

भाजप माझ्या बापाचा पक्ष : पंकजा मुंडे

सगळं नीट झाल्यावर अपराधी किंवा संकोच वाटेल असं न बोलण्याची दोघांना विनंती करतो, त्याचे ओरखडे राहतात. त्यामुळे पक्षावर राग काढू नका. आपलं घर आहे, घरातलं भांडण रस्त्यावर नको अशी विनवणीही चंद्रकांत पाटील यांनी केली.

गोपीनाथ मुंडे यांनी ज्याप्रकारे पक्ष वाढवला त्याची जाणीव भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे. गोपीनाथ मुंडे हे कायम माझ्या पाठिशी उभे राहिले. शरद पवारांवर टीका करण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं, मात्र त्यांनी कधीही त्यांचा अनादर केला नाही. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही वाटचाल करत आहोत, असंही चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil on Eknath Khadse) सांगितलं.

गोपीनाथ मुंडे हे भरल्या ताटावरुन गेले असं म्हटलं जातं ते खरंच आहे. ते अचानक आपल्यातून निघून गेले. भाजप हा पक्ष महाराष्ट्रात वाढवण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. मुंडेंच्या निधनानंतर खचून न जाता पंकजा मुंडेंनी कुटुंबाला समर्थपणे सावरलं, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी कौतुक केलं.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी भाषण करण्याआधी पंकजा मुंडे यांनी माईक हाती घेत कुणीही चंद्रकांत पाटील यांच्या भाषणात व्यत्यय आणू नयं, असं आवाहन समर्थकांना केलं होतं.

संबंधित बातम्या :

पंकजा मुंडेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

माफ करा चंद्रकांतदादा, मी आज मुक्ती मागतेय : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही : एकनाथ खडसे

बारामतीची पालखी वाहणार नाही, पण चंद्रकांतदादा तुम्ही त्रास देता हे मान्य करा : महादेव जानकर

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.