पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाही? चंद्रकांत पाटील म्हणतात, “आम्ही कोरी पाकिटं असतो!”

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेली माही. याबाबात राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे.अश्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केलंय.

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाही? चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही कोरी पाकिटं असतो!
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 12:45 PM

मुंबई : पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधानपरिषदेची उमेदवारी (Legislative Council Candidacy) मिळालेली माही. याबाबात राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे.अश्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावर भाष्य केलंय. “आम्ही कोरी पाकीटं असतो. पक्ष जो निर्णय घेतो , तो आम्हा सर्वांना मान्य असतो”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

पंकजा मुंडेंना उमेदवारी का नाही?

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल अशी जोरदार चर्चा होती. पण यावेळीही पक्षाने त्यांना डावललं आहे. त्यावरच चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलंय. “उमेदवारीचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेत असतात. हा निर्णय दिल्लीतून झाला आहे आणि हा निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे”, असं ते म्हणाले आहेत.

“आम्ही कोरी पाकिटं”

पंकजा यांच्या उमेदवारीबाबत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा, “आम्ही कोरी पाकिटं असतो. पक्ष जो पत्ता लिहील तिथं आम्ही जात असतो. त्यामुळे राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याने त्याच्या चाहत्याने इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय पक्ष घेतो. विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा अश्या महत्वाच्या निवडणुकांची उमेदवारी केंद्र घेत असतं आणि पक्षाने घेतलेला निर्णय पक्ष शिस्तबद्ध कार्यकर्त्या म्हणून सर्वांनी तो मान्य करायचा असतो”, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

“पंकजांना उमेदवारी मिळावी म्हणून फडणवीसांचे प्रयत्न”

“पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी खूप प्रयत्न केले. परंतू केंद्राने काही भविष्यातील विचार केला असेल, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय. पंकजाताईंनाही हा निर्णय मान्य असेल, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

पंकजा मुंडेची पुन्हा संधी हुकली

बीडमधून 2019 मधील आमदारकीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर नंतर पंकजा मुंडे यांना राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा आहे. याआधीही राज्यसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत होतं. मात्र तेव्हाही पंकजांना संधी देण्यात आली नाही. महाराष्ट्रातील विविध राजकीय कार्यक्रमांमधूनही पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचं चित्र दिसत होतं. मुंबईत झालेला ओबीसी आरक्षणासाठीचा मोर्चा, औरंगाबादेतला जलाक्रोश मोर्चा या नुकत्याच झालेल्या मोठ्या दोन भाजपच्या इव्हेंटमधूनही पंकजांची गैरहजेरी ठळकपणे दिसून आली. ओबीसी नेत्या असूनही त्या इथे सक्रिय दिसल्या नाहीत. याउलट भाजपचे राष्ट्रीय सचिवपद दिल्याने राष्ट्रीय पातळीवर राजकारणात त्या दिसून येत आहेत. आता विधान परिषदेच्या निमित्ताने तरी महाराष्ट्रातील राजकारणाशी त्यांचा थेट संबंध येईल, अशी अपेक्षा पंकजांच्या समर्थकांना होती. मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या नावाला समर्थन दिलं होतं. मात्र, ती अपेक्षा पूर्ण न झाल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे.

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.