AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर खास कोल्हापुरी शैलीत जोरदार टीका केली. (Chandrakant Patil)

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 1:23 PM

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर खास कोल्हापुरी शैलीत जोरदार टीका केली. आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, अशी जोरदार टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (Chandrakant Patil slams sanjay raut over jan ashirwad rally)

भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी टीका केली होती. जन आशीर्वाद यात्रा काढा की कुठल्याही यात्रा काढा जनतेचे आशीर्वाद आम्हालाच आहे, असं राऊत म्हणाले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास कोल्हापुरी शैलीतच राऊतांचा समाचार घेतला. आरं बाबा, ज्याची तुला भीती नाही ते वारंवार कशाला बोलतो. तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

तुम्ही गिमिक करून सत्तेत

भाजपच्या दोन नेतृत्वाने देशाला विकलं या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. या देशाच्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की, कोणी कोणाला काही म्हणू शकतो. त्यामुळे वडेट्टीवार यांचं ते मत आहे. शेवटी राजकारणात कुणाला मतं मिळतं, कुणाचं सरकार येतं यावर ठरत असतं. तुमचं सरकार काही लोकांनी मतं देऊन आलेलं नाही. तुम्ही गिमिक करून सत्तेत आला आहात. मोदी लोकांनी मत दिल्याने आले आहेत. तुम्ही मोदींवर बोलून काय होतंय, असा चिमटा त्यांनी काढला. वडेट्टीवार हे देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे आपलं मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. मोदींनी देशाला पुढे नेलं की खड्ड्यात घातलं हे लोकं ठरवतील. मतपेट्यातून ते दिसतंच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

सत्तांतराचा संबंध नाही

हा रुटीन दौरा होता. आम्ही वारंवार दिल्लीत जातो. नेक्स्ट जनरेशन उभी केली पाहिजे या हेतूने आमचं काम चालतं. त्यामुळे राम शिंदे, संजय कुंटे, चंद्रशेखर बावनकुळे आदी सर्वांना घेऊन आम्ही दिल्लीत गेलो. मंत्र्यांना भेटणं आणि खातं समजून घेण्यासाठी हा दौरा होता. मोदी-शहांची भेट सोडली तर सर्वांची भेट झाली. अधिवेशनामुळे मोदी आणि शहांची भेट होऊ शकली नाही, असं सांगतानाच या दौऱ्याचा आणि राज्यातील सत्तांतराचा काहीच संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मनसे युतीबाबत रेड अॅलर्ट नाही

मनसे-भाजप युतीची या भेटीत चर्चा होणार होती ती झाली नाही. त्याबाबत विचारले असता, आमची युतीसाठी भेट नव्हतीच. एकमेकांना समजून घेणं, मनसेची परप्रांतियांबाबतची भूमिका समजून घेण्यासाठी ही भेट होती, असं सांगतानाच युतीबाबत केंद्रीय नेतृत्वाने रेड अॅलर्ट दिला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (Chandrakant Patil slams sanjay raut over jan ashirwad rally)

संबंधित बातम्या:

अमित शाहांची भेट झाली असती तर बरं झालं असतं : चंद्रकांत पाटील

VIDEO: चंद्रकांतदादा चार दिवस दिल्लीत थांबले, ना मोदी, ना शहांची भेट; मनसे युतीचा निर्णय अधांतरी?

भाजप इलेक्शन मोडवर? केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्रा काढणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

(Chandrakant Patil slams sanjay raut over jan ashirwad rally)

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.