चंद्रपुरात भाजपची व्यूहरचना यशस्वी, मुनगंटीवारांचा विश्वासू नेता ‘स्थायी’च्या सभापतीपदी

चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपचे रवी आसवानी यांची निवड करण्यात आली. (Chandrapur Standing Committee Election )

चंद्रपुरात भाजपची व्यूहरचना यशस्वी, मुनगंटीवारांचा विश्वासू नेता 'स्थायी'च्या सभापतीपदी

चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेच्या स्थायी समिती आणि झोन सभापती निवडीत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. स्थायी समिती सभापतीपदी अनुभवी नगरसेवक रवी आसवानी (Ravi Aaswani) यांची निवड झाली आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचा विश्वासू मोहरा अशी आसवानींची ओळख आहे. (Chandrapur Municipal Corporation Standing Committee President Election Sudhir Mungantiwar aid Ravi Aaswani)

भाजपची व्यूहरचना यशस्वी

रवी आसवानी यांच्या निवडीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. स्थायी समितीच्या सभापती आणि झोन सभापती निवडीसाठी बिनविरोध निवडणूक झाली. भाजपच्या पूर्ण बहुमतातील या महापालिकेत पक्षाची व्यूहरचना यशस्वी झाली.

मुनगंटीवारांचा विश्वासू नेता

चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपचे रवी आसवानी यांची निवड करण्यात आली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विश्वासातील आसवानी यांची निवड अपेक्षित अशीच आहे.

कोण आहेत रवी आसवानी?

आतापर्यंत या पदावर बहुजन चेहरा होता. यावेळी पहिल्यांदाच भाजपने त्यात बदल केला. रवी आसवानी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते महापालिकेत पहिल्यांदाच निवडून आले आहेत. याआधी नगरपालिका असताना ते बांधकाम सभापती होते.

भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

महापालिकेच्या तीन झोनमधील सभापती पदी देखील भाजप नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड होताच भाजप कार्यकर्त्यांनी महापालिकेबाहेर जल्लोष करत त्यांचे वाजतगाजत स्वागत केले. यावेळी रवी आसवानी यांनी चंद्रपूर शहरात विकास कामे गतीने होतील, अशी ग्वाही दिली. (Chandrapur Standing Committee Election )

चंद्रपूर महापालिका पक्षीय बलाबल

भाजप – 36 काँग्रेस – 12 बसपा – 08 राष्ट्रवादी – 02 शिवसेना – 02 मनसे – 02 प्रहार – 01 अपक्ष – 03

एकूण – 66

(स्रोत : विकीपीडिया)

संबंधित बातम्या :

महापौरपदासाठी पक्ष सोडणाऱ्या राखी कंचर्लावार दुसऱ्यांदा चंद्रपूरच्या महापौर

(Chandrapur Municipal Corporation Standing Committee President Election Sudhir Mungantiwar aid Ravi Aaswani)

Published On - 3:08 pm, Fri, 5 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI